महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 19:46 IST2023-06-27T19:45:59+5:302023-06-27T19:46:21+5:30
प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात का बोलता, असा जाब मारहाण करणाऱ्यांनी विचारला.

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांना 'वंचित'च्या कार्यकर्त्यांची मारहाण
पनवेल: महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंग सेंगर यांच्यावर आज(दि.27) रोजी हल्ला करण्यात आला आहे. औरंगाजेबाच्या कबरीवर श्रद्धांजली वाहली म्हणून तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात का बोलता, असा हल्ला करणाऱ्यांनी सेंगर यांना जाब विचारला. पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ईमारतीत ही घटना घडली.
याविरोधात सेंगर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सेंगर यांना मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सेंगर हे आपल्या वादग्रस्त कार्यक्रमातून नेहमीच चर्चेत असतात. दरवर्षी पनवेल मध्ये सेंगर हे नथुराम गोडसे यांची जयंती साजरी करतात. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते. प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे सेंगर यांच्याविरोधात वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.