शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : रायगडमध्ये फडकला महायुतीचा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:12 IST

Maharashtra Election 2019: शेकापचा सफाया ;अलिबाग, महाड, कर्जत शिवसेनेकडे; तर पेण, पनवेल भाजपकडे

- आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकर सहा मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकला आहे, तर एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे रोखण्यात यश मिळवले आहे. महायुतीच्या झंझावातापुढे शेकापचा सुपडा साफ झाला, तर जिल्ह्यात काँग्रेस औषधालाही उरलेली नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी, कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे, पेण मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील, अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी, महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिला आहे. शेकापला या निवडणुकीत महायुतीने धूळ चारली आहे. त्यांनी उभा केलेला एकही उमेदवार निवडून आलेला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील शेकापच्या अस्तित्वावर आपोपच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्े आहे. शिवसेनेने अलिबागची जागा शेकापकडून, तर कर्जतची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिसकावली. महाडची जागा राखताना मात्र उरणची जागा गमावली आहे.

भाजपने पनवेलची जागा कायम ठेवतानाच पेणची जागा शेकापकडून घेतली आहे, तसेच उरणमधील शिवसेनेच्या ताब्यातील जागेवर भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी वर्चस्व मिळवत युतीलाच धक्का दिला आहे. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली जागा राखली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शेकापचे आहे. शेकापचे चारही उमेदवार पराभूत झाले आहेत. काँग्रेससाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशीच होती. मात्र, काँग्रेसने महाड वगळता कोणत्याच मतदारसंघात लक्षात राहील अशी कामगिरी केलेली दिसत नाही. जिल्ह्याला आता अलिबाग, उरण, पेण, कर्जत, श्रीवर्नधन या पाच मतदारसंघातून नवीन आमदार लाभले आहेत. तर पनवेल, महाडमध्ये मतदारांनी जुन्याच आमदारांना पुन्हा संधी दिल्याने भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांना हॅट्ट्रिक साधता आली आहे. जनतेने दिलेला कौल शेकापसह काँग्रेसनेही मान्य केला आहे. यापुढे शेकापला आणि काँग्रेसलाही पराभवाची कारणे शोधतानाच आत्मपरीक्षण करावे लागेल, एवढे मात्र निश्चित आहे.

राष्ट्रवादीकडे श्रीवर्धन; उरण अपक्षाकडे

श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी बाजी मारली आहे. तर उरण मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडून आल्याने आता उरण मतदारसंघ अपक्षाकडे गेला आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटवले होते. मात्र, मतदारांनी महायुतीच्याच बाजूने कौल दिल्याने रायगडमध्ये महायुतीने बाजी मारली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019uran-acउरणshrivardhan-acश्रीवर्धनpanvel-acपनवेलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा