रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

By राजेश भोस्तेकर | Updated: May 1, 2023 11:05 IST2023-05-01T11:04:28+5:302023-05-01T11:05:00+5:30

यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.

Maharashtra Day in Raigad in excitement; Hoisting of the flag by Guardian Minister Samant | रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

रायगडात महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग :  महाराष्ट्र दिनाचा ६३ वा वर्धापन दिन आज रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पोलीस महासंचालकांचे उत्कृष्ट पोलीस पदक ९ पोलीस अधिकारी , कर्मचारी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तसेच उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या ताफ्यात नवीन वाहने

रायगड पोलीस विभागाला जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत मंजूर झालेल्या निधीतून वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी १ कोटी ३३ लाख निधी देण्यात आला होता. या वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत याच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी वाहन पोलीस चालक याना नारळ वाढविण्याचा मान पालकमंत्री यांनी दिला.
 

 

Web Title: Maharashtra Day in Raigad in excitement; Hoisting of the flag by Guardian Minister Samant