VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! १९ तासांनंतर ढिगाऱ्याखालून चिमुकल्याची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:55 IST2020-08-25T13:43:50+5:302020-08-25T13:55:25+5:30
महाड इमारत दुर्घटना: चिमुकल्याची सुटका करण्यात एनडीआरएफला यश

VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! १९ तासांनंतर ढिगाऱ्याखालून चिमुकल्याची सुखरुप सुटका
महाड: महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन काल संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला १९ तास उलटल्यानंतर एका चिमुकल्याची सुटका झाली आहे. चार वर्षांच्या मोहम्मद बांगीला ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे.
महाड इमारत दुर्घटना: १९ तासांनंतर साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश #RaigadBuildingCollapse#mahadbuildingcollapsepic.twitter.com/a0cTqUCywo
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
मोहम्मद बांगीला (वय 4 वर्षे) १९ तासांनी जिवंत बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास तारिक गार्डन इमारत कोसळली. अद्याप ढिगाऱ्याखाली १५ पेक्षा जास्त जण अडकलेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा शोध एनडीआरएफकडून सुरू आहे.
दुर्घटनेतील जखमींची नावं- नमिरा शौकत अलसूरकर (वय 19 वर्षे), संतोष सहानी (वय 24 वर्ष), फरीदा रियाज पोरे, जयप्रकाश कुमार (वय 24 वर्ष), दिपक कुमार (वय 21 वर्षे), स्वप्निल प्रमोद शिर्के (वय 23 वर्ष), नवीद हमीद दुष्टे (वय 32 वर्षे) आणि मोहम्मद बांगी (वय 4 वर्षे)
दुर्घटनेतील मृतांची नावं- सय्यद अमित समीर, (वय 45 वर्षे) आणि नविद झमाले (वय 35 वर्ष)