भात लावणीसाठी शेतकरी घेताहेत मजुरांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:05 AM2019-07-15T00:05:20+5:302019-07-15T00:05:30+5:30

कर्जत तालुक्यासह सर्वत्र पावसाने दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग घेतला आहे.

Laborers searching for rice cultivation | भात लावणीसाठी शेतकरी घेताहेत मजुरांचा शोध

भात लावणीसाठी शेतकरी घेताहेत मजुरांचा शोध

Next

नेरळ : कर्जत तालुक्यासह सर्वत्र पावसाने दमदार सुरुवात केल्याने कर्जत तालुक्यात भात लावणीच्या कामांना वेग घेतला आहे. सध्या भात लावणी जोरात असून, दरवर्षीप्रमाणे या वषीर्ही मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी भात लावणी करत आहेत. तर काही शेतकरी मजूर शोधून आणून भात लावणी करत आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतक ऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी भात लावणीला वेग आला आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणाहून अनेक प्रकारचे भात बियाणे खरेदी केले असून चांगल्या प्रकारे रोपे तयार झाल्याने भात लावणीस सुरुवात झाली आहे. कर्जत तालुक्यात सर्वात जास्त भाताचे पीक घेतले जाते, त्यामुळे शेतीची कामे जोरात सुरू आहेत. नांगरणी करून भात लावणी सुरू आहे. यंदा भाताचे बियाणे, खते व मजुरांचे दर वाढल्याने शेतीचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे, अशा प्रतिक्रिया शेतकरी देतात. शेतीचा खर्च भरून येत नसल्याने काही शेतकºयांनी आपली शेती दुसºया शेतकºयांना लावणीसाठी दिली आहे, तर काही शेतकरी गादीवाफे करून भात लावणी पद्धतीला खर्च ही कमी येत असल्याने काही शेतकरी गादीवाफे करून शेती करत आहेत.
काही भागात गावागावांत पडकई पद्धतीने दहा ते पंधरा शेतकºयांच्या समूहाच्या गटाने आळीपाळीने एकमेकांच्या शेतांमध्ये लागवड केली जाते. ही पद्धतही कमी होत चालली आहे. यामध्ये ज्या शेतकºयांकडे भातलागवड असेल त्या शेतकºयाकडून दोन वेळच्या जेवणासह सर्व व्यवस्था केली जाते, त्यामुळे भातलागवड वेळेत होते. मजुरांची होणारी टंचाई दूर होते. सध्या शेतकरी आपल्या कुटुंबासह भातलागवडीत मग्न झाला आहे. अनेक शेतकºयांनी जनावरे विकली असल्याने अनेकांना नांगरजोडी मिळत नाही. त्यामुळे भात लावणी करण्यास त्यांना वेळ लागतो, त्यामुळे अनेक जण नांगरणी करण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग करतात.
>मजुरांचा विविध
ठिकाणी शोध
सध्या शेतीच्या कामांना मजूर मिळेनासे झाले आहेत, त्यामुळे मजुरांच्या दरात वाढ झाली आहे. मजुरांना सध्या ३५० ते ४०० रु पये दिले जातात. तरीही कर्जत तालुक्यात मजूर मिळत नाहीत. विशेषत: आदिवासी मजुरांना प्राधान्य दिले जाते. त्यांचाच शोध शेतकरी घेतात. अनेक आदिवासीवाडीमध्ये जाऊन मजुरांना आणावे लागते.

Web Title: Laborers searching for rice cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.