कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 05:30 PM2023-10-12T17:30:04+5:302023-10-12T17:30:42+5:30

जासई येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.

Labor leader Suresh Patil's mother Vithabai Kamlakar Patil passed away today | कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक

कामगार नेते सुरेश पाटील यांना मातृशोक

उरण : भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांच्या मातोश्री विठाबाई कमळाकर पाटील यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी मंगळवारी (१०)  वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर जासई येथील स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मनमिळावू, कुटुंबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या विठाबाई यांनी १९८४ च्या दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.त्यांच्या पश्चात चार मुले,मुलगी, सुना, नातवंडे असा  परिवार आहे. 

Web Title: Labor leader Suresh Patil's mother Vithabai Kamlakar Patil passed away today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड