Khandala: देव तारी त्याला कोण मारी, दरीत पडूनही वाचला तरुण, झाडाच्या फांदीत अडकून राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 13:38 IST2023-04-22T13:37:54+5:302023-04-22T13:38:34+5:30

Khandala - खंडाळा घाटात रात्री मंकी पॉईंट येथून दरीत पडलेला तरुण एका झाडाच्या फांदीला अडकल्याने वाचला.

Khandala: God Tari who killed him, the young man survived falling into the valley, got stuck in the tree branch | Khandala: देव तारी त्याला कोण मारी, दरीत पडूनही वाचला तरुण, झाडाच्या फांदीत अडकून राहिला

Khandala: देव तारी त्याला कोण मारी, दरीत पडूनही वाचला तरुण, झाडाच्या फांदीत अडकून राहिला

खोपोली/ लोणावळा - खंडाळा घाटात रात्री मंकी पॉईंट येथून दरीत पडलेला तरुण एका झाडाच्या फांदीला अडकल्याने वाचला. आज्जू मंडल (२५) मूळचा ओदिशाचा तरूण खंडाळा घाटात ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र रस्ता चुकला व पाय घसरून खोल दरीत कोसळला.

दरीत कोसळल्यानंतर त्या तरुणाने आपल्या रिक्षाचालकाशी संपर्क केला. रिक्षाचालकाने लोणावळा पोलिस स्टेशन व शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुनील गायकवाड, शिवदुर्ग मित्र मंडळाची टीम, वन्य जीवरक्षक दल, मावळ आणि गुरुनाथ साठेलकर हे आज्जूच्या मदतीला धावले. सुखरूप सुटका झाल्यानंतर तरुणाच्या जीवात जीव आला.

 

Web Title: Khandala: God Tari who killed him, the young man survived falling into the valley, got stuck in the tree branch

टॅग्स :Raigadरायगड