महाड एमआयडीसी येथून ₹88.92 कोटी केटामाईन अमली पदार्थ जप्त
By राजेश भोस्तेकर | Updated: July 24, 2025 08:53 IST2025-07-24T08:51:38+5:302025-07-24T08:53:02+5:30
तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे.

महाड एमआयडीसी येथून ₹88.92 कोटी केटामाईन अमली पदार्थ जप्त
- राजेश भोस्तेकर
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलिस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे ₹88.92 कोटी किंमतीचा केटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा एकूण साठा जप्त करण्यात आला. या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून, सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे. ही कारवाई म्हणजे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले.