शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

कर्जत नगर परिषद विषय समिती निवडणुकीत युतीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 11:20 PM

कर्जत नगर परिषदेमध्ये सोमवारी विविध विषय समित्यांची निवडणूक पार पडली.

कर्जत  : कर्जत नगर परिषदेमध्ये सोमवारी विविध विषय समित्यांची निवडणूक पार पडली. राज्यात शिवसेना-भाजप युती दुभंगली असली तरी कर्जत नगर परिषदेमध्ये ती भक्कम आहे. त्यामुळेच या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार युतीचे निवडून आले. हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. कर्जत नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्याधिकारी पंकज पाटील उपस्थित होते. 

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी राहुल प्रल्हाद डाळिंबकर, वीज सार्वजनिक बांधकाम शहर नियोजन व विकास समिती सभापतीपदी स्वामिनी मांजरे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी संचिता पाटील यांची निवड झाली. उपसभापतीपदी प्राची डेरवणकर यांची बिनविरोध निवड झाली तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी पदसिद्ध म्हणून उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांची निवड करण्यात आली.

या व्हिडीओ कॉन्फरन्स सभेत १३ सदस्य सहभागी झाले होते. आता नगर परिषदेमध्ये १८ नगरसेवक आहेत, त्यापैकी १० नगरसेवक महायुतीकडे आहेत तर ८ नगरसेवक राष्ट्रवादी - मनसे -स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.  

टॅग्स :Karjatकर्जत