शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कारगिल विजय दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:28 PM

महाविद्यालयीन युवकांचा सहभाग : राज्यातील ९० हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना युद्धपटाचा घेता येणार आनंद

आविष्कार देसाई अलिबाग : २६ जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात यावर्षी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा यद्धपट राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहात एकाच दिवशी आणि एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ९० हजार महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना या युद्धपटाचा आनंद घेता येणार आहे. हा युद्धपट मोफत दाखवण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

देशावर होणाऱ्या आतंकवादी हमल्यांना आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता चोख प्रतिउत्तर देऊन त्यांना चारीमुंड्या चीत करतात. भारतीय सैन्याची हिंमत, पराक्रम त्यांचे शौर्य आजही अबाधित आहे. सीमेवर आपले शूर जवान तैनात असल्याने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्यामुळेच आपण शांतपणे झोपू शकतो. अशा सर्वच जवानांबाबत प्रत्येक भारतीयांना अभिमान आणि प्रेम आहे.

चीन, पाकिस्तान यांनी आपल्यावर हल्ले केले होते. त्यांच्या गोळ््यांना भारतीय जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. आतंकवाद्यांना हाताशी धरुन पाकिस्तान देशाच्या विविध भागांमध्ये आतंकवादी हमले करत आहेत. १९९९ साली कारगिल युद्ध झाले होते. ते भारताने बखुबी जिंकले होते. पाकिस्तानने यातून धडा घेतला नाही. त्यांच्या कुरापती सुरुच राहिल्या. त्यांनी मुंबईवरील २६/११ हल्ला, गुरदासपूर हल्ला, पठाणकोट येथे वायू सेनेवर हल्ला त्यानंतर १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी ब्रिगेड मुख्यालयावर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये भारताचे १९ सैनिक आणि चार दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर ११ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. भारतीय सैन्याच्या अभिमानास्पद कामगिरीने देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.

२६ जुलै १९९९ रोजी करगिल युद्धातही भारताने शौर्य गाजवले होते. तो दिवस विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्यात आगळवेगळ््या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहांमध्ये उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा युद्धपट दाखवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. याबाबतची बैठक संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात १५ जुले रोजी पार पडली. या बैठकीला चित्रपटाचे निर्माते, वितरक यूएफओचे प्रतिनिधी, राज्यातील एक पडदा चित्रपटगृहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चित्रपट दाखवण्याच्या सूचना- सत्यजीत दळीया चित्रपटाचे सॅटलाइट प्रक्षेपण यूएफओमार्फत एकाच वेळी सर्व ठिकाणी सकाळी १० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. अलिबागमधील ओम, ब्रम्हा, विष्णू, महेश या सिनेप्लेक्समध्येही उरी हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून हा चित्रपट दाखवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तयारी सुरु असल्याचे चित्रपट गृहाचे मालक सत्यजीत दळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनUri MovieउरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस