शेकाप,काँग्रेसची एकत्रित गटनोंदणी; धक्कातंत्र अवलंबत केतन भगत यांची गटनेतेपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 20:09 IST2026-02-03T20:08:41+5:302026-02-03T20:09:12+5:30

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी करीत पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केली.

Joint group registration of SHKAP, Congress; Ketan Bhagat appointed as group leader using shock tactics | शेकाप,काँग्रेसची एकत्रित गटनोंदणी; धक्कातंत्र अवलंबत केतन भगत यांची गटनेतेपदी नियुक्ती

शेकाप,काँग्रेसची एकत्रित गटनोंदणी; धक्कातंत्र अवलंबत केतन भगत यांची गटनेतेपदी नियुक्ती

वैभव गायकर

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेने फारकत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकाप आणि काँग्रेसने एकत्रित गटनोंदणी करीत पहिल्यांदाच नगरसेवक बनलेल्या केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केली.
      
यावेळी माजी आमदार बाळाराम  पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील,अनिल नाईक,प्रकाश म्हात्रे ,देवेंद्र मढवी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.१३ नगरसेवकांच्या गटाची नोंदणी यावेळी करण्यात आली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना केतन भगत यांची व्हिप अनिवार्य असणार आहे. विरोधीपक्ष नेते पदासाठी १० टक्के संख्याबळ विरोधकांकडे असणे गरजेचे आहे. ते संख्याबळ दोन पक्षाकडे असल्याने विरोधीपक्ष नेते पद या दोन पक्षांकडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, १ स्वीकृत नगरसेवक देखील या दोघांना निळणार आहे.

शिवसेना ठाकरे गट सोबत आल्यास आणखी एक स्वीकृत नगरसेवक महाविकास आघाडीला मिळणार आहे. स्वतंत्र गट स्थापन केलेल्या ठाकरे गटाला देखील विरोधीपक्ष नेते पद हवे असल्याने महाविकास आघाडी मधील नेते पुढील काळात काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काँग्रेस आणि शेकाप नगरसेवकांचा एकत्रित गट स्थापन करून केतन भगत यांची गटनेते पदी नियुक्ती केल. आहे. मागील वेळेला प्रीतम म्हात्रे यांची गट नेते आणि विरोधीपक्ष नेते पदावर निवड केल्यानंतर आमच्या समोर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुढील  काळात तसे होणार नाही. गटनेत्यांचा व्हीप सर्व नगरसेवकांना बंधनकारक असेल.
- बाळाराम पाटील (शेकाप नेते)

Web Title : शेकाप, कांग्रेस का गठबंधन; केतन भगत बने नेता

Web Summary : पनवेल में शेकाप और कांग्रेस ने गठबंधन किया, केतन भगत को नेता चुना। गठबंधन का लक्ष्य विपक्ष का नेतृत्व हासिल करना और एक मनोनीत पार्षद पद प्राप्त करना है, जिससे शिवसेना (यूबीटी) के साथ भविष्य की राजनीतिक गतिशीलता प्रभावित हो सकती है।

Web Title : Shetkari Kamgar Paksha, Congress Form Alliance; Ketan Bhagat Appointed Leader

Web Summary : Shetkari Kamgar Paksha and Congress allied in Panvel, appointing Ketan Bhagat as their group leader. This alliance aims to secure opposition leadership and a nominated corporator position, potentially influencing future political dynamics with Shiv Sena (UBT).

टॅग्स :panvelपनवेल