काही पक्षांची मुक्तता करीत जेएनपीएने साजरा केला प्रजासत्ताक दिन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 03:33 PM2024-01-26T15:33:05+5:302024-01-26T15:33:19+5:30

जेएनपीए बंदरात प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या उत्साहपूर्ण प्रदर्शनासह साजरा करण्यात आला.

JNPA celebrated Republic Day by freeing some parties | काही पक्षांची मुक्तता करीत जेएनपीएने साजरा केला प्रजासत्ताक दिन 

काही पक्षांची मुक्तता करीत जेएनपीएने साजरा केला प्रजासत्ताक दिन 

मधुकर ठाकूर 

उरण: "आपल्या महान राष्ट्राला आकार देणाऱ्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणून प्रजासत्ताक दिनाचे खूप महत्त्व आहे. सहभागी आणि समुदायाचे समर्पण आणि उत्साह पाहणे हा एक अमूल्य क्षण आहे.सार्वभौम राष्ट्र म्हणून परिभाषित केलेल्या आदर्शांचे स्मरण करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत.” अशा भावना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातुन व्यक्त केल्या.

जेएनपीए बंदरात प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या उत्साहपूर्ण प्रदर्शनासह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि जनेपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या हस्ते भारतीय तिरंगा फडकवून उत्सवाची सुरुवात झाली. याप्रसंगी जेएनपीएचे विविध विभागप्रमुख, कामगार विश्वस्त, कर्मचारी, भागधारक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना देशाला वैभवशाली बनवणाऱ्या आपली संस्कृती आणि आदर्शांचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. या उत्सवाचा एक भाग होण्याचा मला सन्मान वाटतो. जिथे आपण एक अभिमानी आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून परिभाषित केलेल्या आदर्शांचे स्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत.” अशा भावना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी
यावेळी व्यक्त केल्या.

याप्रसंगी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी  डॉग शो आणि रिफ्लेक्ट शूटिंग प्रात्यक्षिक सादर केले. तसेच स्वातंत्र्य आणि शांततेचे प्रतीक म्हणून काही पक्ष्यांनाही मुक्त करण्यात आले. तसेच जेएनपीएतील सेंट मेरी स्कूल आणि आरकेएफ  विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. उरण परिसरात ठिकठिकाणीही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.उरण तहसील कार्यालयातर्फे प्रजासत्ताक दिनी तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर उरण नगर परिषदेच्या प्रांगणात मुख्याधिकारी समीर जाधव तर उरण पंचायतीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: JNPA celebrated Republic Day by freeing some parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.