शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदारांच्या समस्यांकडे औद्योगिक महामंडळाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:07 IST

संपूर्ण कोकणात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली महाड औद्योगिक वसाहत ही ‘केमिकल झोन’ म्हणून ओळखली जाते. सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रांत उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला ३0 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.

- संदीप जाधव महाड : संपूर्ण कोकणात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेली महाड औद्योगिक वसाहत ही ‘केमिकल झोन’ म्हणून ओळखली जाते. सुमारे ८०५ हेक्टर क्षेत्रांत उभारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेला ३0 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी कारखानदारांच्या समस्यांकडे मात्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाण्याची मुबलकता, दळणवळणाची चांगली सोय, मुंबईसारखे महत्त्वाचे शहर जवळ असूनही गेल्या काही वर्षांत या औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग निर्मिती झालेली नाही.महाड औद्योगिक क्षेत्रात ३५० भूखंड उद्योजकांनी विकत घेतले असले तरी शंभरहून अधिक भूखंडांवर गेल्या ३0 वर्षांत एकही कारखाना उभा राहिलेला नाही. हे भूखंड औद्योगिक विकास महामंडळाने पुन्हा ताब्यात घेणे अपेक्षित होते. महाड औद्योगिक क्षेत्रात आज अनेक गुंतवणूकदार कारखाने उभे करण्यास उत्सुक आहेत. मात्र, भूखंड उपलब्ध नसल्यामुळे या औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटला आहे. सध्या या औद्योगिक क्षेत्रात १७० लहान-मोठे कारखाने सुरू आहेत, तर पन्नासहून अधिक कारखाने वेगवेगळ्या कारणांमुळे बंद आहेत. बिर्ला ग्रुपचा कोकण सिंथेटिक फायबर, मल्टी फ्लेक्स, दिपाल फॅब्रिक्स,त्रिंबक इंडस्ट्रीज,रेव्हलॉन पेन,पोद्दार, खटाव ह्या मोठ्या उद्योगांसह अनेक लहान कारखाने आज बंद आहेत.महाड औद्योगिक क्षेत्रातील नव्वद टक्के कारखाने रासायनिक प्रक्रिया उद्योग करणारे आहेत. त्यामुळे या परिसरात जल, वायू प्रदूषणाचा प्रश्न नेहमीच निर्माण होत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून महाड उत्पादक संघटनेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने या प्रदूषणावर मात करण्यात यश मिळवले आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनांंवर सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राने कठोर कारवाईची पावले उचलल्यामुळे हे प्रदूषण नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.अनेक कारखान्यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवल्यामुळे या कारखान्यांमधून बाहेर पडणारे सांंडपाणी देखील वाढले आहे. मात्र या प्रक्रिया केंद्राची क्षमता संपली असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवण्याची, तसेच यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी उत्पादक संघटनेकडून केली जात आहे.तर, सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेले सांडपाणी वाहून नेणारी पंचवीस वर्षांहून अधिक जुनी वाहिनी जीर्ण झाल्यामुळे ही अनेकदा ठिकठिकाणी फुटून हे सांडपाणी परिसरातील शेतीमध्ये पसरत असते. ही वाहिनी बदलण्याच्या मागणीकडे देखील एमआयडीसीचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच एनआयओ संस्थेने निश्चित केलेल्या ठिकाणापर्यंत वाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे रखडले आहे. हे नवी वाहिनी टाकण्याचे काम जलदगतीने होण्याची गरज आहे.महाड औद्योगिक क्षेत्रात वाहनतळ नसल्याने वाहन पार्किंगची मोठी समस्या आहे. वाहनतळ नसल्याने मुख्य मार्गांवरच अनेक ठिकाणी अवजड वाहने उभी केली जातात, त्यामुळे अपघात देखील घडतात. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी गटारे व नाले देखील अस्तित्वात नाहीत, तर असलेल्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाईच केली जात नसल्याने हे नाले तुंबलेल्या अवस्थेत दिसून येतात. यासह औद्योगिक क्षेत्रातील अनेक समस्यांकडे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कारखानदार करीत आहेत.>कारखानदारांच्या समस्या गंभीरपणे घ्याव्यामहाड औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे एमएमएकडून अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे. सांडपाणी वाहिनी, ट्रक टर्मिनल याबाबत तरी एमआयडीसीने त्वरित कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याबाबत आम्ही योग्य लक्ष देऊ.- अशोक तलाठी, उपाध्यक्ष, एमएमए सीईटीपी>सर्वेक्षण करून माहिती देऊ : उपअभियंताऔद्योगिक क्षेत्रातील किती कारखाने बंद आहेत, याबाबत सर्वेक्षण करून माहिती देण्यात येईल, असे एमआयडीसीचे उपअभियंता एस.एस. गीते यांनी सांगितले. अधिक बोलण्यास गीते यांनी नकार दिला.