शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची पुन्हा दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:11 IST

मे महिन्यात दुरुस्त केलेल्या रस्त्यांना अवघ्या एक महिन्यातच खड्डे पडल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत.

- सिकंदर अनवारे दासगाव : मे महिन्यात दुरुस्त केलेल्या रस्त्यांना अवघ्या एक महिन्यातच खड्डे पडल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. काही मार्गावरील मोऱ्या देखील तुटून गेल्या आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली रानटी रोपे देखील तशीच आहेत. ऐन पावसाळ्यापूर्वी झालेल्या या कामांच्या गुणवत्तेविषयी संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच गटार सफाई न झाल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील सर्व रस्त्यांवर गटारातील पाणी तुंबून राहत आहे. महाड औद्योगिक वसाहतीमधील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार काम करण्याचे दाखवून अर्धवट काम सोडून देत आहे. यामुळे रस्त्यांची देखभाल दुरु स्ती अडचणीत आली आहे.महाड एमआयडीसीमधील रस्त्यांवर कायम अवजड वाहने ये-जा करत असतात. महाड एमआयडीसीमध्ये रासायनिक कारखाने असल्याने माल घेऊन येणारी अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. शिवाय नागरिकांची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांची देखील वर्दळ असते. नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्यागिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे. त्याची दुरु स्ती आणि देखभाल हे एमआयडीसीच्या बांधकाम विभागाकडून केली जाते. प्रतिवर्षी यावर खड्डे बुजवण्यासाठी खर्च केला जातो. यावर्षी देखील मे महिन्यात दुरु स्ती केली होती. महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाबाहेर असलेला मार्ग देखील रु ंद करण्यात आला. मात्र रु ंद केलेला हा रस्ता एक महिन्यातच खराब झाला आहे. या रस्त्यावर एक वीत आत जाईल असे खड्डे पडले आहेत. हा संपूर्ण परिसर औद्योगिक क्षेत्र असल्याने याठिकाणी असलेल्या कारखान्यांचा माल घेवून येणारी वाहने ही कित्येक टन वजनाची असतात. या क्षमतेचा रस्ता मात्र बनवलेला नाही यामुळे सातत्याने वर्दळ असलेल्या या रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पडले आहेत. सन २0१६ -१७ मध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर सुमारे १ कोटीच्या वर खर्च करण्यात आला आहे तर सन २0१७ -१८ मध्ये देखील जवळपास ८0 लाख इतका खर्च पडला आहे. ज्या ठेकेदारांना हे काम दिले जाते त्या ठेकेदाराकडून एमआयडीसी कार्यालयाच्या जवळपास असलेले रस्ते दुरु स्त करत असल्याचे भासवले जाते, मात्र अंतर्गत रस्ते दुरु स्ती आणि इतर कामे जैसे थे ठेवले जातात. सध्या महाड एमआयडीसीमधील रस्ते दुरु स्तीसाठी मे महिन्याच्या आधी पैसे येणे अपेक्षित होते, मात्र ते पैसे उशिरा आले. यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे बुजवणे सुरु झाले. हे खड्डे मातीने भरले गेल्याने अवजड वाहनाच्या वजनाने काही तासातच हे खड्डे जैसे थे स्थितीत आले.>पैसा जातो कुठे? नागरिकांचा सवालएमआयडीसीच्या रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली रोपे देखील काढणे अपेक्षित असताना ही रोपे आजही तशीच आहेत. याकरिता स्वतंत्र टेंडर मंजूर होत असते. मात्र ज्याने हे काम घेतले त्याने प्रमुख मार्गावर काही कामगार लावून सुरवातीचा काही भाग साफ केला आणि बाकी अंतर्गत रस्ते तसेच ठेवून दिले. नाले सफाई देखील बघण्यासारखीच आहे. ही गटारे मातीने भरली गेली आहेत. शिवाय यातील पाणी देखील तसेच साचून आहे. काही ठिकाणी हे पाणी रस्त्यावर साचून आहे. गटार सफाई, रानटी उगवलेली रोपे काढणे, खड्डे भरणे इत्यादी कामासाठी ठेकेदार नेमला असताना त्यांना दिला जाणारा पैसा जातो कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाड एमआयडीसी कार्यालयासमोर, त्याचप्रमणे सुदर्शन, देशमुख कांबळे फाटा, ते थेट बिरवाडीपर्यंत हे खड्डे दिसून येतात. यामुळे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे चुकवताना या रस्त्यावर अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत अद्याप लक्ष दिले नसून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असल्याचे सांगून हात वर केले जात आहेत. या रस्त्यावर वापरले जाणारे डांबर या अल्पावधीत पडलेल्या खड्ड्यांनी संशयात सापडले आहे. महाड औद्योगिक क्षेत्रात पडलेले खड्डे भरण्याचे काम संबंधित ठेकेदार करत असून पावसाचे प्रमाण अधिक असल्याने यास उशीर लागत असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाकडून सांगण्यात आली.