उरणमध्ये सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 09:39 PM2022-12-28T21:39:49+5:302022-12-28T21:40:52+5:30

सरत्या वर्षाला अलविदा करण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तस-तसे  तरुणाईला थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे वेध लागले आहेत.

In Uran, the youth are ready to welcome the New Year | उरणमध्ये सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज

उरणमध्ये सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण - सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली आहे. सरत्या वर्षाला अलविदा करण्याचा दिवस जसजसा जवळ येत आहे. तस-तसे  तरुणाईला थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे वेध लागले आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाईत अनेक मनसुबे आखले जात आहेत. पार्ट्यासाठी ढाबे, फार्म हाऊस, हॉटेल्स बुकिंग करण्यासाठी तरुणाईत चांगलीच चढाओढ लागली आहे. 

काहींनी नेहमीप्रमाणे समुद्र सफर आणि समुद्र किनारीही पार्ट्यांचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. काहींनी तर शेतमळ्यांमध्येच थर्टीफस्टची रात्र साजरा करण्याची सोय केलेली आहे. यामुळे अनेक ठिकाणी डीजेची धूम असणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री तरुणाई मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन थर्टी फर्स्ट बरोबरच नवीन वर्षांच्या स्वागताचा आनंद साजरा करतात. 

 दरम्यान नववर्षाचे स्वागत करताना अतिरेक होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी केले आहे.मद्यप्राशन करून रस्त्याने गोंगाट करणे, नशेत वाहन चालवणे आदी बाबी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.पीरवाडी, माणकेश्वर, समुद्र किनाऱ्यावर आणि सागरी परिसरातही चोख बंदोबस्तासाठी बीट मार्शल आणि ठिकठिकाणी पोलिसांची गस्ती पथकं तैनात करण्यात आली आहेत.

सरत्या वर्षाला अलविदा आणि नववर्षाचे स्वागत करताना आयोजित कार्यक्रमासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या असे आवाहनही करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात येतीलअसा कडक इशाराही एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी  दिला आहे.
 

Web Title: In Uran, the youth are ready to welcome the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.