शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजना : तुटपुंजा अनुदानामुळे लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:31 IST

बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैकी १३८ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली.

अलिबाग : बेघरांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत; परंतु घर बांधणीसाठी सरकारकडून देण्यात येणारे अनुदान अत्यंत तुटपुंजे असल्याने घर पूर्ण करणे कठीण जाते, अशी ओरड सातत्याने लाभार्थ्यांकडून केली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये १८९ प्रस्तावांपैकी १३८ प्रस्तावाना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी फक्त ८० घरेच पूर्ण होऊ शकली आहेत. उरलेले १०९ लाभार्थी मात्र अजूनही घरांच्या प्रतीक्षेत आहेत.प्रत्येकाला घर देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही विविध योजना राबविण्यात येत असून गरीब, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना हक्काचे छप्पर मिळावे, असा त्यामागचा उद्देश आहे. सरकारने रमाई, शबरी आणि आदीम घरकूल योजना आखल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून घरबांधणीसाठी लाभार्थ्यांना सरकारकडून एक लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या रकमेतून त्या लाभार्थ्याला घर उभारायचे असते. मात्र, एवढ्या तुटपुंजा रकमेमध्ये घर उभारणे अत्यंत कठीण आहे. त्यातून घर उभारले गेलेच तर, त्या घराचा दर्जा, गुणवत्ता कशी असेल याचा विचारच न केलेला बरा. अशा गुणवत्ता नसलेल्या घरांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.सरकार समाजमंदिर, निवारा शेड यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, महत्त्वांच्या योजनांच्या माध्यमातून गरिबांना मुख्य प्रवाहात आणणाºया योजनांसाठी हात आखडता घेतला जातो. समाजमंदिरांवर होणारा वारेमाप खर्च टाळून तो प्रत्येक गावागावांमध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी वापरण्याबाबत विचार सुरू असल्याचे मध्यंतरी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवले होते. तसाच विचार आता घरकूल योजनांसाठी केल्यास गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर निश्चितच मिळेल.केवळ ९६ लाखांचा निधीरायगड जिल्ह्यामध्ये घरकूल उभारणीसाठी तब्बल १८९ प्रस्ताव प्रशासनाकडे आले होते. पैकी १३८ प्रस्तावानाच मंजुरी देण्यात आली. त्यातील फक्त ८० घरेच पूर्ण होऊ शकली आहेत. उरलेले १०९ लाभार्थी मात्र उघड्यावरच राहिले आहेत. सरकारकडे ८० घरांसाठी लागणारा फक्त ९६ लाख रुपयांचाच निधी शिल्लक होता. सरकारकडे निधी नव्हता, तर तर १३८ प्रस्तांवाना मंजुरी देऊन गरिबांना घराचे स्वप्न का दाखवले, असा प्रश्न प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सरकारला विचारला आहे.घरकूल मंजूर करताना सर्वच विभागातील ग्रामपंचायत पातळीवर राजकारण केले जाते. निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलेल्या मतदारांचा अशा योजनांसाठी पहिला विचार केला जातो. त्यामुळे खरेच ज्यांना घरांची आवश्यकता आहे, त्यांना त्याचा लाभ होत नाही, यासाठी सरकारसह प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून योग्य लाभार्थ्याची निवड कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे खैरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

टॅग्स :Raigadरायगड