शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

कळंबोलीमध्ये महामार्ग ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:40 IST

मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते.

नवी मुंबई/ पनवेल : मराठा आंदोलनामुळे नवी मुंबईसह पनवेलमधील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प झाले होते. रस्ते व ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. बाजार समितीसह सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. कोपरखैरणे व कळंबोलीमध्ये जाळपोळीसह दगडफेक झाल्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.राज्यातील आंदोलनाचे सर्वात तीव्र पडसाद नवी मुंबई व पनवेलमध्ये उमटले. मराठा समाजाच्या सर्व संघटना, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. पनवेलमधील आंदोलकांनी सकाळीच कळंबोलीमध्ये महामार्ग रोखला. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत, आंदोलकांनी ठिय्या मांडला. खारघर, कळंबोली, कामोठेसह पूर्ण पनवेलमधील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. स्टील मार्केटसह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कळंबोलीमध्ये महामार्ग रोखल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर शुकशुकाट निर्माण झाला होता. कळंबोलीमध्ये आंदोलक व पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.नवी मुंबईमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबईच्या धान्याचे कोठार समजल्या जाणाºया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये मालाची आवक झाली; परंतु ग्राहकच नसल्यामुळे माल पडून होता. इतर चार मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. सीबीडी, नेरुळ, सानपाडा, शिरवणे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोलीसह सर्व विभागामधील दुकाने पूर्णपणे बंद होती. स्कूलबस बंद असल्यामुळे मुलांना चालत शाळेत जावे लागले व चालतच घरी जावे लागले. रिक्षा, बस वाहतूकही जवळपास बंद होती. मेडिकल व रुग्णालय वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बेस्ट व एनएमएमटीच्या बसेसही फोडण्यात आल्या होत्या. सर्व प्रमुख रस्ते आंदोलकांनी रोखून धरले होते. कोपरखैरणेमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.महामार्गावर शुकशुकाटदासगाव : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचा संताप दिसून येत असतानाच महाडमध्ये मात्र शांततेत मोर्चा निघाला. मात्र, गेले दोन दिवस सुरू असलेल्या या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक मंदावली होती.ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर शुकशुकाट दिसून येत होता. महामार्गावर असलेली हॉटेल आणि इतर दुकाने सुरू असली तरी महामार्गावर वाहनांची संख्या कमी असल्याने त्यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला. महामार्ग पोलीस देखील या पार्श्वभूमीवर महामार्गावर लक्ष ठेवून असल्याचे दिसले.महाड-बिरवाडीत मुख्यमंत्र्यांना विरोधबिरवाडी : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये, असा गंभीर इशारा महाडचे आ. भरत गोगावले यांनी महाडमधील सकल मराठा मोर्चा प्रसंगी दिला आहे. महाडमध्ये शांततेत मोर्चा झाला असला, तरी मराठा आरक्षणाबाबत सरकारने योग्य दखल न घेतल्यास महाड पेटायला वेळ लागणार नाही, असा सतर्क तेचा इशारा आ. भरत गोगावले यांनी पोलीस प्रशासन व शासनाच्या अन्य वर्गाला दिला आहे.महाड शहरातील शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै २०१८ रोजी सकाळी सकल मराठा मोर्चा बाजारपेठ मार्गे, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत, महाड प्रांत कार्यालयात दाखल झाल्यानंतर, महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास पोलीस प्रशासनाने आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करू नये, असे स्पष्ट करताना समाजापेक्षा सत्ता आणि पद महत्त्वाचे नसून, पक्षीय जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या तरुणांच्या उज्ज्वल भवितव्याकरिता मराठा आरक्षण मोर्चात सहभागी झालेल्या महिला व समाज बांधवांना धन्यवाद देऊन व्यापारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल गोगावले यांनी आभार व्यक्त केले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाRaigadरायगड