शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

देहविक्री व्यवसायातील महिलांना मदतीचा हात; अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 02:47 IST

महिला व बालविकास विभाग, सद्य:स्थितीत कोविड-१९च्या संकटात या महिलांची, त्यांच्या मुलांची अवस्था बिकट झाली.

रायगड : देहविक्री व्यवसायात अडकलेल्या महिलांना सरकराने मदतीचा हात दिला आहे. रायगडच्या महिला व बालविकास विभागाने या महिलांसाठी अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू केली. पनवेलच्या लोक परिषद सामाजिक विकास संस्थेकडे नोंद असलेल्या १०४ महिलांना या मोहिमेंतर्गत आधार कार्डही देण्यात आले आहेत.

सद्य:स्थितीत कोविड-१९च्या संकटात या महिलांची, त्यांच्या मुलांची अवस्था बिकट झाली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. मात्र, हे संकट दूर होण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाने या महिलांसाठी अन्नधान्य व आर्थिक साहाय्य योजना लागू केली. जेणेकरून त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकेल. यासाठी महिला व बालविकास विभागाने २६ नोव्हेंबर, २०२० रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार या क्षेत्रातील महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक साहाय्य याचा लाभ मिळणार आहे. हा लाभ या महिलांना मिळण्याबाबत जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. 

रायगड जिल्ह्यातील देहविक्री करणाऱ्या ४०१ महिलांना कोरडे अन्नधान्य व आर्थिक साहाय्य रुपये ५ हजार, तसेच शाळेत जाणाऱ्या त्यांच्या मुलांना प्रत्येकी रुपये २ हजार ५००, याप्रमाणे एकूण १५ मुलांना रुपये ६१ लाख २७ हजार ५०० इतके अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात आले आहे. या व्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या महिला, तसेच वेश्याव्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना एकूण ८ क्विंटल धान्य वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे, रोख स्वरूपात आर्थिक साहाय्य, थेट लाभ हस्तांतरण करण्याकरिता संबंधित स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ४५ महिलांचे बचतखाते बँकेत काढण्यात आली आहेत, असेही महिला व बालविकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे या महिलांवर ओढावलेले संकट दूर होणार असून त्यांना स्वत:ची ओळख मिळून दिलासा मिळणार आहे. 

ओळख देण्याचा प्रयत्नसमाज व्यवस्थेतून संस्कृती, परंपरा आणि चालीरीती तयार होत असतात. त्याच समाजमनावर बिंबविल्या जातात. काही परंपरा समाज जीवनावर इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की, अथक प्रयत्नांनीही त्या समाजापासून वेगळ्या करता येत नाहीत. मानवी मूल्यांशी सुसंगत नसलेल्या वेश्याव्यवसायासारख्या काही अनिष्ट प्रथा सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून बंद केल्या जात आहेत. या व्यवसायातील बऱ्याच महिलांना स्वतःचा चेहराही नाही, स्वतःची ओळखही नाही. यासाठी सर्वप्रथम या महिलांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम राबविली असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी दिली.