शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने दिलेली मदत म्हणजे कोकणवासीयांची क्रूर थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 02:02 IST

मुरुड संघर्ष समिती व बागायतदार आक्रमक । मुख्यमंत्र्यांसह इतरांनाही पाठविले निवेदन

आगरदांडा : निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील नारळ, सुपारी, आंबा आदी बागायती पार उद्ध्वस्त होऊन बागायतदारांचे दहा ते बारा वर्षांत भरून येणार नाही, एवढे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, शासनाने नुकसान भरपाई म्हणून नारळ प्रति झाड २५० रुपये सुपारी प्रति झाड ५० रुपये देऊन कोकणवासीयांची क्रूर थट्टाच केली आहे, असा आरोप करून मुरुडच्या संघर्ष समिती व बागायतदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सदर नुकसान भरपाईबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एका निवेदनाजद्वारे केली आहे.

सदर बागायतदारांना शासनाने कांदा-बटाट्याच्या दरात अतिशय तुटपुंजी नुकसान भरपाई दिली आहे. एका सुपारीच्या झाडापासून वार्षिक उत्पन्न १००० रुपये, नारळाच्या झाडापासून २००० रुपये, आंबा ८ ते दहा हजार, फणस, चिकू, पेरू आदीपासून १००० ते १२००रुपये, तर केळीच्या झाडापासून ५०० रुपये उत्पन्न मिळते. कोकणातील बहुतांशी बागायतदारांचे ते उदरनिर्वाहाचे ते एकमेव साधन आहे. कांदा-बटाट्याचे पीक वर्षातून दोनदा येते, परंतु सुपारी, नारळ, आंबा पिकांना दहा ते बारा वर्षे लागतात. म्हणजेच एवढ्या वर्षाचे उत्पन्न बुडाल्यात जमा आहे.मुरुडमधील पंचनामे योग्य तºहेने केले गेलेले नाहीत. शासनाने दिलेली भरपाई ही कोणत्या कृषी तज्ज्ञाकडून माहिती घेऊन दिलेली आहे, असा सवालही करण्यात आला आहे. निवेदनाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री आदिती तटकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.असे झाले आहेनुकसाननुकसानग्रस्त झालेली नारळाची झाडे तोडून उचलण्यास प्रत्येकी2000रुपये,सुपारी झाडास100रुपये प्रत्येक झाडाला,तर आंबा व अन्य झाडांस4000रुपयेअसा खर्च झाला आहे. त्या मानाने दिलेली भरपाई ही अत्यंत तुटपुंजी आहे.

टॅग्स :Raigadरायगड