शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

आंबोली घाटात दरड कोसळली, घाटमार्ग बंद : सिंधुदुर्गचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 10:49 IST

मुख्य धबधब्यापासून पुढे कोसळली दरड. घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद.

ठळक मुद्देमुख्य धबधब्यापासून पुढे कोसळली दरड.घाटरस्ता वाहतुकीसाठी बंद.

महादेव भिसेपावसाळी पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या आंबोली घाटामध्ये शुक्रवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. याबाबत आंबोली पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आंबोली पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी जात पाहणी केली. तत्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला.

आंबोली पोलीस प्रशासनाकडून बांधकाम विभागाला वारंवार याबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद बांधकाम विभागाकडे मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.आंबोली घाट रस्ता हा नेहमी पावसाळ्यात छोटी मोठी दरड कोसळल्याने बंद पडत असतो. त्या अनुषंगाने सध्याची पर्जन्यवृष्टी पाहता बांधकाम विभागाने कायमस्वरूपी जेसीबी व रस्ता कामगार यांची नेमणूक करणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने तत्काळ दरडी काढता येणे शक्‍य असतानाही नाहक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले आहे. बांधकाम विभागाच्या कुचकामीपणाबद्दल यावेळी तीव्र संताप वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून व्यक्त होत होता. निवृत्त रस्ता कामगार शिवराम गावडे यांनी सांगितल्याप्रमाणे आंबोली घाटामध्ये दरड कोसळली. त्यांच्या म्हणण्यानुसार आंबोली घाटातील ब्रिटिशकालीन गटारं वेळच्या वेळी साफ केले असते तर आंबोली घाट सुरक्षित राहिला असता. तसेच वनविभागाने धबधब्यांवर ती बांधलेले बंधाऱ्यांमुळेही मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळत आहेत आणि भविष्यात कोसळण्याची भीतीही निर्माण झाली आहे असेही त्यांनी सांगितले आहे. बांधकाम विभागाच्या वेळकाढूपणामुळे दरड हटविण्यात उशीर होत असून दुपारचे दोन वाजतील असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसhighwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्र