उष्माघाताने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:32 IST2018-04-10T05:32:05+5:302018-04-10T05:32:05+5:30

रायगड किल्ल्यावर तलाव सफाईचे काम करत असलेल्या कामगाराचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला.

Heat stroke death | उष्माघाताने कामगाराचा मृत्यू

उष्माघाताने कामगाराचा मृत्यू

महाड : रायगड किल्ल्यावर तलाव सफाईचे काम करत असलेल्या कामगाराचा सोमवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. या ठिकाणी तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध नव्हती.
बबन राठोड (४२, रा. बुलडाणा) असे कामगाराचे नाव आहे. रायगड प्राधिकरणांतर्गत गडावर विविध तलाव व साठवण टाक्यांच्या स्वच्छतेची कामे सुरू आहेत. त्यासाठी गडावर ७० कामगार काम करत आहेत, परंतु येथे कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सोमवारी दुपारी दीड वाजता अष्टटाकी येथे काम करत असताना बबन यांना उष्माघाताने चक्कर आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी त्यांचा मृतदेह रोपवेने खाली आणण्यात आला.

Web Title: Heat stroke death

टॅग्स :Deathमृत्यू