शासन, जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक
By Admin | Updated: August 6, 2015 03:02 IST2015-08-06T03:02:42+5:302015-08-06T03:02:42+5:30
धरमतर खाडीकिनारी व धरमतर ब्रिजजवळील सर्वे नं. ११७ ते १२३ या डोलवी पट्ट्यातील १८ शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची सातबारा नोंद आहे

शासन, जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात शेतकरी आक्रमक
पेण : धरमतर खाडीकिनारी व धरमतर ब्रिजजवळील सर्वे नं. ११७ ते १२३ या डोलवी पट्ट्यातील १८ शेतकऱ्यांच्या जमिनींवर महाराष्ट्र शासनाच्या नावाची सातबारा नोंद आहे, तर कुळ म्हणून संबंधित शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतजमिनीवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या कन्व्हेअर बेल्ट टप्पा क्र. २ चे बांधकाम सुरू झाल्याने कुळसदरी नोंद असलेले शेतकरी मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनासाठी आमच्या शेतजमिनीत भराव करू नका, याबाबत बैठकीस बसले होते. संबंधित जागा राज्य शासनाची असून याबाबतची परवानगी कंपनीने घेतली आहे. त्यामुळे शेतकरी शासन व कंपनी व्यवस्थापनाशी आंदोलनाच्या मार्गातून लढा देणार असल्याचे शेतकरी गटाचे प्रमुख लीलाधर पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शासन, जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात शेतकरी उपोषण करण्याच्या पवित्र्यात आहेत.
धरमतर ब्रिज व खाडीकिनारची ३२ एकर जागेवर महाराष्ट्र शासन अशी सातबारा उताऱ्यांवर नोंद आहे व त्यावर कुळ म्हणून डोलवी गावातील १८ शेतकऱ्यांची नोंद आहे. सर्व्हे नंबर ११७,११८,१२१,१२२,१२३ कुळ म्हणून मूळ शेतकऱ्यांच्या वारसाचा हा लढा गेली तीन वर्षे महसूल यंत्रणा, जिल्हाधिकारी रायगड, कोकण आयुक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. शेतजमिनीत एकदा भराव केल्यानंतर त्या जमिनी वापरायोग्य राहणार नाही, असे सांगून नाराज झालेले शेतकरी बैठकीतून निघून केले. (वार्ताहर)