मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:40 AM2020-10-27T00:40:57+5:302020-10-27T00:42:17+5:30

Aditi Tatkare News : नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धाटाव (रोहा) येथील सुदर्शन केमिकल्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 'नारीशक्ती सन्मान' पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Girls have more perseverance to do better - Aditi Tatkare | मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे

मुलींमध्ये उत्तम काम करण्याची चिकाटी जास्त - आदिती तटकरे

googlenewsNext

धाटाव : उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कोविड सेंटर, व्हेंटिलेंटर आदी गोष्टींत सुदर्शनसह इतर कंपन्यांची चांगली मदत झाली. त्यामुळे सुदर्शन कंपनीचा सेटअप इथून इतर कुठल्याही राज्यात जाण्याचा विचार त्यांच्या मनात येणार नाही, यासाठी उद्योग विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, असे अभिवचन आदिती तटकरे यांनी दिले.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धाटाव (रोहा) येथील सुदर्शन केमिकल्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ह्यनारीशक्ती सन्मानह्ण पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या सोहळ्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, पोलीस निरीक्षक नितीन बंडगर, सुदर्शन केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी, सीएसआर हेड शिवालिका पाटील, प्लांट हेड संजय शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करणाऱ्या पत्रकारांनाही कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले.
पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट वुमेन टेक्निशिएशन ऑफ द ईअर' सन्मान प्रियांका पाटील, प्रगती कर्णेकर, उल्लेखनीय योगदानाबद्दल चंदा रटाटे, बेस्ट आयडिया सन्मान दीपिका दळवी, मंचिता ठाकूर, समीक्षा कडव, बेस्ट प्रेजेंटर दीप्ती गावंड, बेस्ट एक्सिक्युटर अंकिता पाटील, प्रगती जाधव, मंजुळा मोहिते या महिलांचा सन्मान करण्यात आला.

आदिती तटकरे म्हणाल्या की, शहरी, ग्रामीण, दुर्गम अशा तीन भागांत रायगड विभागला आहे. त्यामुळे कंपन्यांना विस्तार करताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी चांगले औद्योगिक धोरण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता हाच सामाजिक विकासाचा महत्त्वाचा धागा आहे. औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा अशी ओळख निर्माण व्हावी, असेही त्या म्हणाल्या.

आवड जोपासून काम करायला हवे
निधी चौधरी म्हणाल्या की, ह्यप्लांटमध्ये मुली काम करताना पाहून मला आनंद झाला. कंपनीच्या आवारात केलेले पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, योग्य प्रकारे घेतलेली काळजी समाधानकारक आहे. शिक्षण, लग्न, जमेल ती नोकरी न करता, आपली आवड जोपासून काम करायला हवे. चांगली स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी. या प्रवासात आपल्याला थांबवणाऱ्या अनेक व्यक्ती भेटतील, त्यांना दुर्लक्षित करून आपण आपले ध्येय पूर्ण करावे. महिला काम करतात, तेव्हा ते उत्तम दर्जाचे काम होते.

Web Title: Girls have more perseverance to do better - Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.