शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 8:27 AM

Pen Ganesh idols: बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती देताना सांगितले.

पेण : कोरोना संकट असतानाही विन्घहर्ता श्री गणेशाची परदेशवारी अर्थात सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. पेणच्या दीपक कला केंद्रातून शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ५००० गणेशमूर्ती अमेरिका, थायलंड या देशांमध्ये आज (दि. २३ मे) रवाना होणार असल्याचे मूर्तीकार दीपक समेळ यांनी सांगितले.बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती देताना सांगितले. २०२१ या वर्षातील गणेशोत्सव १० सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर उशिरा का होईना परंतु जात असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे.गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाप्पांच्या परदेशवारीत खंड पडून २५ हजार गणेश मूर्तींची परदेश वारी न झाल्याने मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही पुन्हा एकदा कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्याने मार्च महिन्याच्या अखेर मागणी केलेल्या गणेशमूर्तींची ऑर्डर अखेर मे महिन्याच्या अखेरीस जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने पेणच्या मूर्तीकला विश्वात आनंद व्यक्त केला जात आहे. साधारणपणे पाऊणफूट उंचीपासून पाच फूट उंचीच्या मूर्ती थायलंड, अमेरिका, लंडन, माॅरिशस या देशांत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी समुद्रमार्गे पोहोचतील.  ४० फूट लांब कंटेनर ४० फूट लांब कंटेनरमध्ये १००० लहान मूर्ती सामावतात. तर दोन व पाच फूट उंचीच्या ५०० ते ६०० बाॅक्स कंटेनरमध्ये असून, अशा सात कंटेनरममधून मूर्ती जाणार आहेत. गणेशोत्सव १० सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर मिळाल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRaigadरायगडbusinessव्यवसाय