शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा दुथडी भरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:29 IST

एसटीचे वेळापत्रक कोलमडले; बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

पनवेल : मागील काही दिवसांपासून थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी जिल्ह्यातील अनेक भागांत पुन्हा जोर धरला. पावसामुळे गाढी, काळुंद्रे, पाताळगंगा नदीचे पात्र भरून वाहू लागले. त्याचबरोबर परिसरातील नालेसुद्धा मंगळवारी दुथडी भरून वाहत होते. जोरदार पावसामुळे पनवेल परिसरातील सखल भागात पाणी साचले. काही भागात तर गुडघाभर पाणी साचल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.रविवारी रात्रीपासून कोसळणाºया मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पनवेलकरांना बसला. ठिकठिकाणी पाणी साचले होते. नाले, गटारे तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे महापालिकेच्या मान्सूनपूर्व नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. काही भागातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी वाहने रस्त्यावरच बंद पडल्याचे दिसून आले. पनवेल शहरातील सोसायटीतील लिटल अन्जल्स स्कूलकडे जाणारा रस्ता, शिवाजी पुतळ्याजवळील किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, पंचरत्न हॉटेलजवळील रस्ता, मोमीन पाडा, ओएनजीसी कॉलनी, नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल आदी ठिकाणचे रस्ते जलमय झाले होते. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलजवळील रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पनवेल महापालिकेच्या शाळेभोवती देखील गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते.चौल-रेवदंडा परिसराला झोडपलेरेवदंडा : गेले दोन दिवस हलक्या सरी कोसळत असताना सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने चौल-रेवदंडा परिसराला झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी सर्वच विद्यालयात विद्यार्थी संख्या घटलेली दिसली. एसटी फेºयांचे वेळापत्रक कोलमडलेले होते. अनेक नद्या, नाले दुथडी भरून पुन्हा वाहू लागले असून सखल भागात पाणी साचले. बाजारपेठेत भाजीविक्रेते, दुकाने खुली असली तरी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी घराबाहेर न पडणे पसंत केल्याने शुकशुकाट जाणवत होता. कार्यालयात, बँकांत कामकाज थंडावलेले दिसले. पावसाने नारळ काढणीची कामे बंद पडली आहेत. सुपारी पिकावर रोगाची भीती बागायतदारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Potholeखड्डेRaigadरायगडRainपाऊस