शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 5:34 AM

सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली.

दासगाव : महाड तालुक्यात सोमवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री, काळ, आणि गांधारी या नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे महाड शहरात, तसेच ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच शहरात विविध भागांत सावित्री नदीचे पाणी शिरल्याने नागरिक, व्यापारी धास्तावले आहेत.

सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे, दस्तुरी नाका येथेही पाणी वर आल्याने सकाळपासूनच दस्तुरी नाका ते नातेखिंड हा मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. केंबुर्लीनजीक असलेल्या गांधारी पुलावरून पुराचे पाणी गेल्याने, महाड शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. दासगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात सावित्री खाडीतील पाणी शेतीमध्ये घुसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दादली पुलावरून नदीचा प्रवाह, नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला१महाड : पावसाचा जोर मंगळवारी सायंकाळी कायम राहिल्याने महाड शहरासह नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे. सावित्री नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, या नदीवरील दादली पुलावरून या नदीचा प्रवाह सायंकाळी वाहू लागल्यामुळे महाडवासीयांची भीती वाढली आहे, तर या पुलावरून वाहतूक बंद झाल्याने नदीपलीकडील अनेक गावांचा महाड शहराची संपर्क तुटला आहे.२महाड शहरांमध्ये गांधारी नाका आणि दस्तुरी नाका या मार्गाने शहरांत प्रवेश करता येतो, परंतु मंगळवारी पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दोन्ही मार्ग वाहातुकीसाठी बंद आहेत. सावित्री नदीची पाण्याची धोका पातळी ६.५० मिटर असून, ही धोक्याची पातळी नदीने ओलांडली असून, सकाळी ९ वाजता पातळी ७.३० मीटर झाली होती. मुसळधार पावसाने महाड तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने, नगरपरिषद, महसूल प्रशासन, पंचायत समितीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.चोवीस तासांत१ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंदच्सोमवार, ३ आॅगस्टला दिवसभर पावसाची संततधार सुरू होती, तर सायंकाळी या पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे सोमवारी सकाळी ८ ते मंगळवार ४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ या चोवीस तासांत १ हजार ८५१.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. ११५.७१ मिमीच्या सरासरीने हा पाऊस नोंदविला गेला आहे. यामध्ये दक्षिण रायगडात पावसाचा जोर जास्त होता.च्रोह्यात सर्वाधिक १९८.०० मिमी पाऊस पडला. त्या खालोखाल पोलादपूर तालुक्यात १९७ मिमी, म्हसळ्यात १६५ मिमी, माणगाव व सुधागडमध्ये १६० मिमी, तळा तालुक्यात १२६ मिमी पाऊस पडला. उरणमध्ये १३४ मिमी, अलिबाग ७९ मिमी, पेण ६० मिमी, मुरुड ९२ मिमी, पनवेल ७२ मिमी, कर्जत ६०.६० मिमी, खालापूर ६५ मिमी, महाड ९७ मिमी, श्रीवर्धन ९८ मिमी, माथेरान ८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाबरोबर जोरदार वारे वाहत आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात ४ ते ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असून, अशी पूर्वसूचना प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे नदी परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, महाड तालुक्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर कुंडलिका आणि आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमधील सावित्रीने धोका पातळी ओलांडली आहे, तर रोह्यातील कुंडलिका व आंबा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यात मंगळवारपासून तीन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने, नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे, तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, विद्युत खांब, स्विच बोर्ड, इलेक्ट्रिक वायर्स यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. उत्तर कोकणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे जोरदार वारे वाहत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगडfloodपूर