खांदेश्वर स्टेशन सामोरील अक्षर बिल्डिंगच्या चौदाव्या माळ्यावर आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 18:31 IST2023-10-29T18:30:10+5:302023-10-29T18:31:11+5:30

कारण अद्याप समोर आले नाही.

Fire on 14th Floor of Akshar Building opposite Khandeshwar Station | खांदेश्वर स्टेशन सामोरील अक्षर बिल्डिंगच्या चौदाव्या माळ्यावर आग

खांदेश्वर स्टेशन सामोरील अक्षर बिल्डिंगच्या चौदाव्या माळ्यावर आग

पनवेलखांदेश्वर रेल्वे स्टेशन समोरील अक्षर बिल्डिंगच्या चौदाव्या मजल्यावर डी विंग मध्ये आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली.एसी ब्लास्ट झाल्याने हि घटना घडल्याचे बोलले जाते मात्र खरे कारण अद्याप समोर आले नाही.

घटनेची माहिती मिळताच कळंबोली ,नवीन पनवेल येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.संबंधित ईमारतीत रहिवासी फ्लॅट मध्ये हि घटना घडली.या घटनेत कोणीही जखमी झाला नसला तरी त्याठिकाणच्या घरातील सामान पूर्णपणे जळून झाक झाला आहे.हे नुकसान लाखोंच्या घरात आहे.

आगीने मोठ्या प्रमाणात पेट धरल्याने धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले.ऑक्टोबर हिट मुळे मोठ्या प्रमाणात उकाडा होत आहे.गर्दीमुळे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसवरील लोड वाढून अशाप्रकारच्या घटना उन्हाळ्यात घडत असतात.त्याचाच हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Fire on 14th Floor of Akshar Building opposite Khandeshwar Station