शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

लोणेरे विद्यापीठालगत माळरानात वणवा, शेकडो झाडे, वन्यजीव भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 2:33 AM

माणगाव तालुक्यातील लोणेरे विद्यापीठालगत माळरानावर वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात दासभक्तांनी लावलेल्या वृक्षांची होळी होत आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : तालुक्यातील लोणेरे विद्यापीठालगत माळरानावर वणवा लावण्याचा प्रकार सुरू आहे. अज्ञानी लोकांकडून हे कृत्य केले जात असून, वणव्यात दासभक्तांनी लावलेल्या वृक्षांची होळी होत आहे. झाडे जळण्याबरोबरच छोट्या-मोठ्या वन्यप्राण्यांच्या वावरावरही त्याचा परिणाम होत आहे. जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याने या घटना घडत आहेत. या घटनांना चाप लावण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.माणगाव तालुक्यात लहान-मोठे डोंगर, टेकड्या व पठार यावर पावसाळ्यानंतर मोठे गवत दाटीवाटीने उगवलेले असते. या गवताचा तेथील ग्रामस्थांना फार त्रास होत असतो. नाचणी, वरई पिके घेण्यासाठी हे अनावश्यक गवत शेतकऱ्यांना त्रासाचे ठरते. ते काढण्यासाठी नाहक मजुरीवर खर्च येत असतो. येथील शेतकरी परंपरेनुसार गवत व सुका झाडपाला तसेच पालापाचोळा एकत्रित पेटवून राब करीत असतात. त्यामुळे राख निर्माण होऊन पिकाला ती पोषक असते, असा त्यांचा गैरसमज झालेला आहे. मात्र, ही पारंपरिक पद्धत अतिशय चुकीची आहे. त्याऐवजी गवत व पालापाचोळा नांगरून त्यानंतर ते कुजवून विविध प्रकारची पिके घेतल्यास जमिनीचा पोत वाढून पिकांचे उत्पादन वाढू शकते; यासाठी गावागावांत शासनस्तरावर जनजागृती करायची मोहीम हाती घेतली आहे; परंतु बहुसंख्य शेतकरी गवत जाळूनच शेती करतात. हे गवत जाळत असताना तालुक्यात ठिकठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार दरवर्षी सातत्याने घडत आहेत. सुमारे ९९ टक्के वणवे मानवनिर्मित असून, त्यामुळे जंगलातील वनसंपदा आणि वन्यजीव नष्ट होत असल्याने पर्यावरणाचा समतोल झपाट्याने ढासळत आहे. शेतकऱ्यांनी यासाठी वन व कृषी विभागाचा सल्ला घेतल्यास विविध पिकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते, असे संबंधित खात्याच्या अधिकाºयांनी सांगितले.गेल्या वर्षीदेखील वणव्याने विद्यपीठामधील नारळाची शेकडो झाडे जाळून खाक झाली होती. या ठिकाणी विद्यपीठाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. हे संपूर्ण क्षेत्र माळरान भागात असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. झाडे-झुुडपे असल्यामुळे वन्यप्राण्यांसाठी येथे पोषक वातावरण आहे. तर या ठिकाणी पडीक जमिनींमध्ये परिसरातील गावातील पाळीव जनावरांच्या चाºयासाठी गवत असून, त्या ठिकाणी शेकडो जनावरे चरत असतात.वणव्यांकडे वनविभागाचे दुर्लक्षप्रत्येक वर्षी डोंगरांना लागलेले वणवे विझविण्यासाठी रात्रीच्या वेळीही स्थानिक नागरिक जीवाची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. आग लागल्याची माहिती काही निसर्गप्रेमींना समजताच त्या ठिकाणी धाव घेतात.मात्र, अपुºया मनुष्यबळामुळे काही वेळा आग आटोक्यात आणण्यास उशीर होतो, तोपर्यंत बहुतांश डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला असतो. लागलेला वणवा विझविण्यासाठी वनविभागाकडून म्हणावे तेवढे प्रयत्न होताना दिसत नाहीत.वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेची गरजजानेवारी महिन्यानंतर विद्यापीठ प्रशासन आणि वनविभागाने योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये शेकडो एकर क्षेत्र खाक होते.तर काही संकुचित विचाराच्या लोकांकडून जाणीवपूर्वक विद्यपीठ परिसरातील माळरान पेटवून दिले जात आहेत. वणव्यांमुळे अनेक वन्यप्राण्यांचे जीव जात आहेत.तर समर्थ सदस्यांनी लागवड केलेले वृक्ष जळून खाक होत आहेत. वणव्यात लाखोंचे नुकसान होत आहे.हे नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासन आणि वनविभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेची आहे.जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीरया परिसरातील शेकडो पाळीव जनावरे या माळरानावर क्षेत्रातील चाºयावर अवलंबून असतात. या क्षेत्रातील मुबलक चाºयामुळे मेअखेरपर्यंत सुकलेला चारा या जनावरांना उपलब्ध असतो. मात्र, वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

टॅग्स :Raigadरायगडfireआग