Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 08:22 AM2019-09-03T08:22:24+5:302019-09-03T11:27:31+5:30

Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. 

Fire breaks out at a uran ONGC gas plant | Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू

Uran ONGC Fire: उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग, चार जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देउरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच जेएनपीटी आणि ओएनजीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  मंगळवारी सकाळी ही भीषण आग लागली असून या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधे अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लिक्विड लिकेजमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. 

याआधी सोमवारी रात्री (2 सप्टेंबर) भेंडखळ-उरण येथील बामर लॉरी गोदामातील भरलेल्या कंटेनरमधील कपड्याला अचानक आग लागली होती. या आगीत कंटेनरमधील माल जळून खाक होऊन लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. 

 

Web Title: Fire breaks out at a uran ONGC gas plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.