महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 17:10 IST2022-10-20T17:08:46+5:302022-10-20T17:10:19+5:30
महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे.

महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज कंपनीला आग; अग्नीशमन दलाच्या गाड्या रवाना
महाड: महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे. महाड एम.आय.डी.सी. महाड नगर पालिका आणि प्रिव्ही ऑरगॅनिक्स कंपनीच्या आग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहे.
रायगड जिल्ह्यातील युनिटी फॅबटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट डी ४८ मधील फॅबटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या कंपनीमध्ये कार्पेट बनवण्याचा कारखाना असून यामध्ये काही प्रमाणात ऑइलचे ड्रम असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याअसून आग विझवण्याचे काम मोठ्या शर्तीने करत आहेत. सदर घटनेत सध्या कोणीही जखमी अथवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
महाड एमआयडीसीमधील युनिटी फॅबटेक्स इंडीस्ट्रीज या कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. pic.twitter.com/mlKuomeITS
— Lokmat (@lokmat) October 20, 2022