शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:40 AM

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. पाळीव तसेच मोकाट जनावरांना उष्माघात आणि कोल्ड स्ट्रोकची बाधा होत आहे, तर भर उन्हात फिरणाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाळीव जनावरांमध्ये बकºया, कोंबड्या यांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रतिवर्षी वाढतच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसात हा परिणाम कोकणात देखील जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान ३५ ते ४० अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या उष्म्याचा फटका जसा मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे. कोकणात ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात जनावरे उघड्यावर मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात यामुळे कोल्ड स्ट्रोक येतो आणि जनावर दगावले जाते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वणव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते खातात. अनेक वेळा लग्न सोहळ्याच्या वेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्याने देखील जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यातील तीव्र उष्म्याने जनावरांना त्रासदायक ठरत आहे.आरोग्याच्या समस्यातळपत्या उन्हात फिरल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत. डोके दुखणे, ताप येणे, सर्दीचा त्रास, चक्कर अशी लक्षणे असलेले रुग्ण सध्या दवाखान्यात आढळून येत आहेत. महाड आणि परिसरात कधी नव्हे ते यावर्षी तापमानाचा पारा चढला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास सावलीमध्ये उभे राहावे, अंग थंड पाण्याने पुसावे, लहान मुलांना उन्हात पाठवू नये.- डॉ. अजित पुल्ले,

महाडग्रामीण भागातील शेतकºयांनी आपली जनावरे सकाळी १० च्या आत सोडून पुन्हा गोठ्यात आणली पाहिजे, शिवाय जनावरांना देखील चांगले पाणी आणि चारा वेळेवर दिला पाहिजे. लसीकरण आणि वेळीच उपचार करून घेतल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.- डॉ. डी.एस.सोनावले,सह आयुक्त पशुवैद्यकीय केंद्र 

टॅग्स :RaigadरायगडHeat Strokeउष्माघात