पोयनाड - नागोठणे मार्गावरील श्रीगाव नजीकच्या रस्त्यावर भीषण अपघात

By राजेश भोस्तेकर | Updated: September 26, 2022 18:55 IST2022-09-26T18:54:16+5:302022-09-26T18:55:15+5:30

पोयनाड नागोठणे मार्गावरील श्रीगाव रस्त्यावर सोमवारी इको आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला.

fatal accident on the road near shrigaon on poynad nagothane route | पोयनाड - नागोठणे मार्गावरील श्रीगाव नजीकच्या रस्त्यावर भीषण अपघात

पोयनाड - नागोठणे मार्गावरील श्रीगाव नजीकच्या रस्त्यावर भीषण अपघात

लोकमत न्युज नेटवर्क

अलिबाग: पोयनाड नागोठणे मार्गावरील श्रीगाव रस्त्यावर सोमवारी इको आणि मोटार सायकलची समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून मोटार सायकलवरील दोन जणांना मार लागला असून जखमी एका ची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची माहिती कळताच शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी तसेच पोयनादड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजा केणी यांनी आपल्या स्वतः च्या रुग्ण वाहिकेतुन दोन्ही जखमींना अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

पोयनाड नागोठणे मार्गावरून मोटार सायकल स्वार हा नागोठणेकडे भरधाव वेगाने निघाला होता. श्रीगाव येथे मोटार सायकल स्वार आला असता समोरून येणाऱ्या इको कारवर जोरात जाऊन आदळला. अपघात एवढा भीषण होता की मोटार सायकलचा चक्काचूर होऊन दोघेही मोटार सायकल स्वार रस्त्यावर पडून रक्तबंबाळ झाले होते. तर इको कारलाही समोरचा भाग पूर्णपणे दबला गेला आहे. अपघातात जखमी झालेले तरुण हे थळ गावातील आहेत. 

अपघाताची घटना कळताच राजा केणी घटनास्थळी दाखल होऊन जखमीना त्वरित रुग्णालयात दखल केले. पोयनाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळीचा पंचनामा केला व पुढील तपास करीत आहेत. आजकाल तरुण मंडळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहने चालवीत असतात व वाहनावरील ताबा सुटून अशा प्रकारचे अपघात घडून स्वतःचा जीव धोक्यात आणत आहेत याची खंत राजा केणी यांनी यावेळी व्यक्त केली.
 

Web Title: fatal accident on the road near shrigaon on poynad nagothane route

टॅग्स :Accidentअपघात