स्थानिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत खा. सुनील तटकरे आग्रही, आरसीएफच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:43 IST2020-07-30T16:41:25+5:302020-07-30T16:43:55+5:30
स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना खा. सुनील तटकरे यांनी वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या.

स्थानिकांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत खा. सुनील तटकरे आग्रही, आरसीएफच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक
रायगड - प्रकल्पग्रस्त तसेच स्थानिकांच्या रोजगाराबाबत रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. याच संदर्भात आज त्यांनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलाझर्स (RCF) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हेही उपस्थित होते. यावेळी स्थानिकांना तसेच प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना खा. सुनील तटकरे यांनी वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालकांना दिल्या.
तसेच चक्रीवादळातील नुकसानग्रस्त व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताची कामे तसेच इतर विकासकामांसाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व त्यांच्या पुनर्वसनाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच, कंपनीतील कामगारांबाबतच्या समस्या व त्यांच्या आरोग्यविषयक घेतल्या जाणार्या खबरदारीविषयी खा. सुनील तटकरे यांनी विचारपूस केली. कामगारांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. तसेच नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्थानिक तरुणांना काम देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.