विकास गोगावलेंसह आठ जणांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 09:24 IST2026-01-26T09:23:02+5:302026-01-26T09:24:19+5:30

Vikas Gogawale News: महाड नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी रविवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत पोलिसांना शरण आलेल्या विकास गोगावलेंसह अन्य आठ जणांना जामीन मंजूर झाला आहे.

Eight people including Vikas Gogawale granted bail | विकास गोगावलेंसह आठ जणांना जामीन

विकास गोगावलेंसह आठ जणांना जामीन

महाड - महाड नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी रविवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत पोलिसांना शरण आलेल्या विकास गोगावलेंसह अन्य आठ जणांना जामीन मंजूर झाला आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) च्या पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिंदेसेनेचे विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे, सिद्धेश शेठ या आठ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, राष्ट्रवादी (अजित पवार) कडून शरण आलेल्या हनुमंत जगताप, श्रेयश जगताप, धनंजय देशमुख, जगदीश पवार, नीलेश महाडिक या पाच जणांना न्यायालयाने एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तसेच आज, सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे.

या गुन्ह्यातील राष्ट्रवादीचे मुख्य आरोपी सुशांत जाबरे हे शनिवारी उशिरा आपल्या अन्य तीन साथीदारांसह पोलिसांना शरण आले होते. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. महाड नगरपरिषद निवडणूक मतदानाच्या दिवशी झालेल्या या हिंसाचार प्रकरणामुळे गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राज्यभरात मोठी चर्चा सुरू होती. या प्रकरणात दाखल परस्परविरोधी गुन्ह्यांमध्ये उच्च न्यायालयाने सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते.

न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष
अटकपूर्व जामीन फेटाळताना उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासन व राज्य शासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केले होते. न्यायालयाने शिंदेसेनेचे विकास गोगावले यांना २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार विकास गोगावलेंसह एकूण आठ जणांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली.

एकामागोमाग पोलिसांना शरण
राष्ट्रवादी (अजित पवार) चे हनुमंत जगताप व अन्य चार जणांनीही पोलिसांसमोर शरण येत हजेरी लावली होती. तर राष्ट्रवादी (अजित पवार) चे मुख्य आरोपी सुशांत जाबरे व अन्य तीन जण शनिवारी उशिरा पोलिसांसमोर शरण आले होते. आता आज, सोमवारी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत राष्ट्रवादीच्या आरोपींना जामीन मंजूर होतो का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून, न्यायालयाच्या आजच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Web Title : विकास गोगावले समेत आठ लोगों को झड़प मामले में मिली जमानत

Web Summary : महाड झड़प मामले में विकास गोगावले और सात अन्य को जमानत मिली। पांच एनसीपी सदस्यों को न्यायिक हिरासत में भेजा गया। अदालत के फैसलों का इंतजार होने से तनाव बरकरार है।

Web Title : Bail Granted to Vikas Gogawale, Eight Others in Clash Case

Web Summary : Vikas Gogawale and seven others got bail in the Mahad clash case. Five NCP members were remanded to judicial custody. Tensions remain high as court decisions are awaited.