शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, २५ फेब्रुवारीला होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:31 AM

रायगड जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १६० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि १६० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामीण विभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशीच एकाही उमेदवारांना अर्ज दाखल केला नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.रायगड जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सार्वत्रिक निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये प्रथमच थेट सरपंचपद निवडले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर सर्व तालुक्यांतील १६० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांच्या पोट निवडणुकीचा हा कार्यक्रम आहे. ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १२ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार निश्चित करतील, त्या ठिकाणी व त्या वेळेत मतमोजणी होईल. निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला असल्याने, या ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे.आरक्षित जागांवर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना सादर करावे लागणार असल्याचे बोलले जाते. यापूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीची पावती जोडल्यानंतर उमेदवारी अर्ज भरता येत होता. त्यानंतर, जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास अवधी मिळत होता. मात्र, आता ज्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल, त्यांच्यासमोर उमेदवारी अर्ज दाखल करणे अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.>पोट निवडणुकाअलिबाग : रामराज, सातिर्जे, थळ, आंबेपूर, रांजणखार डावली, शहापूर, चौल, कुसुंबळे, आवास, चिंचवली, खंडाळे, मुरु ड- सावली, वावडुंगी, एकदरा, पेण- कोपर, बोर्झे, शेडाशी, निधवली, करंबळी आराव, वरेडी, रावे, कामार्ली, मुढांणी.पनवेल : गव्हाण, वडघर, सोमटणे, आदई, विचुंबे, तरघर, मोर्बे, वहाळ, खैरवाडी, उलवे.उरण : फुंडे, म्हातवली.कर्जत : पळसदरी, आसल, शेलू, कशेळे, बीड बुद्रुक, जिते, हुमगांव, वैजनाथ.खालापूर : चौक, वडगांव, गोरठण बुद्रुक, नडोदे, हाळखुर्द, वरोसे, बोरगांव, माजगाव, वावर्ले.रोहा : तिसे.तळा : गिरणे, रोवळा, पढवण, निगुडशेत, वाशी हवेली, रहाटाड.सुधागड : परळी, महागांव, राबगाव, वाघोशी, नांदगाव.महाड : आकले, सांदोशी, वरंडोली, वाळण बुद्रुक, पांगारी, आंबेशिवथर, दहिवड, कुंभेशिवथर, भावे, भेलोशी, नरवण, पिंपळकोंड, मुमुर्शी, कांबळे तर्फे महाड, खरवली, खर्डी, भोमजाई, केंबुर्ली, लाडवली, चिंभावे मोहल्ला, दादली, गोठे बुद्रुक, कुंबळे, घावरेकोंड, फाळकेवाडी, राजिवली, शिरवली, ताम्हाणे, वडवली, कोळशे, पुनाडे तर्फे नाते, पंदेरी, वाळण खुर्द, बारसगाव पिंपळवाडी, रूपवली, चापगाव, काचले, तळोशी, कोकरे तर्फे नाते, चांढवे खुर्द, बावळे, तेलंगे मोहल्ला, टोळ बुद्रुक, तेलंगे, शेल, चांढवे बुद्रुक.माणगाव : देगाव, तळाशेत, पेण तर्फे तळे, कुंभे, कुमशेत, पळसप, न्हावे.पोलादपूर : कुडपण बुद्रुक, पांगळोली, महालगूर, चरई, पळचील, वाकण, गोवले, तुर्भे बुद्रुक, तुर्भे खोंडा, वझरवाडी, गोळेगणी, परसुले, लोहारे, बोरघर, पैठण, कोतवाल खुर्द, उमरठ, ओंबळी. श्रीवर्धन- गाणी, कार्ले, चिखलप, वाकळघर, बागमांडला, भरडखोड, दिघी, आदगाव, वेळास, कुडगाव, हरवित, काळांजे, गालसुरे, शेखाडी, कुडकी.म्हसळा : खरसई, तुरंबाडी, देवघर, कुडगाव, रेवळी, लिपणी वावे, फळसप, जांभूळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.>पनवेलच्या दहा ग्रामपंचायतींत पोटनिवडणूकपनवेल : पनवेल तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पनवेल महापालिकेच्या निवडणुकानंतर, पनवेलमध्ये पुन्हा एकदा ग्रामीण भागात निवडणुकींचे वारे वाहू लागले आहे. तालुक्यातील मोरबे, खैरवाडी, आदई, विचुंबे, तरघर, वडघर, सोमटणे, वहाळ, उलवे, गव्हाण या १० ग्रामपंचायतींमध्ये २५ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक पार पडत असून, नामनिर्देशपत्र दाखल करण्याची तारीख ५ ते १० फेब्रुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत आहे. अर्जांची छाननी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख १५ फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ असून, याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दुपारी ३ वाजल्यानंतर केले जाणार आहेत. मतमोजणी १६ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वा. सुरू होणार आहे.मोरबे येथे प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जमातीसाठी एका जागेवर, खैरवाडी येथे प्र. १मध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एका जागेवर, आदई येथे प्र.३ मध्ये सर्वसाधारण महिलेसाठी एका जागेवर, विचुंबे येथे प्र.१ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एका जागेवर, तरघर येथे प्र.३ मध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एका जागेवर, वडघर येथे प्र. ६ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी एका जागेवर, सोमटणे येथे प्र.३ मध्ये सर्वसाधारणसाठी एका जागेवर, वहाळ येथे प्र. ५ मध्ये सर्वसाधारणसाठी एका जागेवर, उलवे येथे प्र. ३ मध्ये अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिला या दोन जागांसाठी, गव्हाण येथे प्र.२ मध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी, प्र.३ मध्ये अनुसूचित जमातीच्या महिला व अनुसूचित जमातीसाठी दोन जागांवर, प्र. ४ मध्ये अनुसूचित जमाती महिला व अनुसूचित जमातीसाठी २ जागांवर तर प्र. ५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागांसाठी मतदान होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड