ट्रेलर अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 05:44 IST2018-10-25T05:43:57+5:302018-10-25T05:44:03+5:30

ट्रेलर अंगावरून गेल्याने तरुणाचा बुधवारी जागीच मृत्यू झाला.

Due to the trailer going away, the youth died on the spot | ट्रेलर अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

ट्रेलर अंगावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

मोहोपाडा : ट्रेलर अंगावरून गेल्याने तरुणाचा बुधवारी जागीच मृत्यू झाला. वाशिवली येथील अल्पेश शिंदे (२१) व करण शिंदे हे सावरोली खारपाडा रस्त्यावरून दुचाकी घेऊन पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राच्या दिशेने निघाले होते. याचवेळी वाशिवली हद्दीतून भरधाव वेगाने निघालेल्या ट्रेलरने अल्पेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अल्पेश जागीच ठार झाला, तर करण हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रेलर चालक उमाराम उरखाराम (२४) तसेच क्लीनर जोगाराम जियाराम (३१) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Due to the trailer going away, the youth died on the spot

टॅग्स :Accidentअपघात