शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 3:01 AM

रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

- मिलिंद अष्टिवकररोहा : रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे भक्तगणांच्या खिशाला कात्री लागत आहे. नवरात्री आणि दसरा या धार्मिक उत्सवात फुलांच्या किमतींनी सीमोल्लंघन केल्याने फुले खरेदी करताना भाविकांचा काहीसा हिरमोड होत आहे.नवरात्री उत्सवात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते, त्याप्रमाणे रोहा शहरासह तालुक्यातील बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी बहरल्या आहेत. तालुक्यातील मंदिर देवस्थान, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे यासह साडेतीन शक्तिपीठे, ग्रामदैवत, गावदेवांची घटस्थापना केली जाते. त्यांच्यासह घरोघरी देवघटी बसलेले कुळदेव आदीचे पूजन केले जाते. या दिवसांत उपवास, नवस करून देवीला साकडे घातले जाते. अनेक वेळा आपले घरच्या देवांचीही घटी बसवली जाते. यात देवाला आवडणाऱ्या फुलांचे हार, देवीला शेवंतीच्या फुलांच्या वेण्या व देवाच्या मुख्य गाभाºयात व प्रवेशद्वाराजवळ फुलांची सजावट लोक करत असतात. यासाठी फुले खरेदीवर श्रद्धेपोटी मोठा खर्च केला जातो. त्यामुळे या दिवसांत झेंडू व शेवंती फुलांच्या मागणीत वाढ होते. यंदा मात्र पिवळा व लाल झेंडू २०० रुपये, पिवळी व पांढरी शेवंतीच्या फुलांची किंमत किलोमागे २०० रुपये इतकी झाली आहे.गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात फुलांच्या किमती ५० टक्क्यांनी कमी होत्या. फुलांना एवढा भाव गणपती उत्सवातही नव्हता. झेंडू व अन्य फुलांच्या किमतीत भाव वाढल्याने नागरिकांना नाइलाजास्तव फुले खरेदी करावी लागत आहेत. तर या वर्षी किमती कधी नव्हे त्या गगनाला भिडल्याने भक्तगणांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.बाजारात या वर्षी फुलांची आवक कमी आहे, यामुळे आमची खरेदीच १६० रुपये किलोने होत असल्याने २०० रु. किलोने नाइलाजास्तव विक्री करावी लागत आहे. गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये प्रती किलो इतका भाव होता, तसेच मालाची आवक मोठी होती. - प्रतिक मोहिते, फूलेविक्रेता

टॅग्स :Navratriनवरात्रीRaigadरायगड