शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:46 AM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र पावसामुळे महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील मानीमध्ये डोंगराच्या अर्धवट झालेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग खचू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक मातीच्या ढिगारा मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरुन येऊन कोसळल्याने वाहतूक मंदावली होती. दरड कोसळल्याने चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला जलद गतीने सुरुवात झाली आहे. खोदकाम, मोºया, मातीचे भराव ही कामे तेजीत सुरु करण्यात आलेली आहेत. कामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली यामुळे ठिकठिकाणी दुसºया टप्प्याचे काम ठेकेदार कंपनीला बंद करावे लागले. सुरुवातीच्या कामामध्ये ठेकेदार कंपनीकडून महाड तालुका हद्दीत राष्ट्रीय माहमार्गालगत चार ठिकाणी वळणावरचे डोंगर फोडण्याचे काम सुरु आहे. यापैकी केंबुर्ली गाव हद्दीत असलेल्या मानी या ठिकाणी अशाच प्रकारे चौपदरीसाठी डोंगर फोडण्याच्या कामाला पावसामुळे थांबवण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत हे काम अर्धवट राहिल्याने याठिकाणी महामार्गालगत असलेल्या या सरळच डोंगर भागाचा सततच्या लागणाºया पावसामुळे काही भाग पोकळ असून सरळ सरळ मातीचा ढीग मुंबई-गोवा महामार्गावरच कोसळू लागला आहे. शनिवारी मध्यरात्री अचानक या भागात एक मातीचा मोठा ढिगारा येऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरच कोसळला. रात्रीची वेळ आणि अंधार या ढिगाºयामुळे या मार्गावरुन जाणाºया-येणाºया वाहनांना धोकादायक स्थिती निर्माण करुन बसला होता.या अगोदर अशाच प्रकारे दोन वेळा महामार्गावर मातीचे ढिगारे येऊन कोसळले होते. या ठिकाणचे काम अर्धवट राहिल्याने ही परिस्थितीत निर्माण झाली आहे. पावसामुळे ठेकेदार कंपनीला पुढचे काम करणे अवघड आणि अडचणीचे ठरले आहे. तीन वेळा या ठिकाणी या पावसामध्ये मातीचे ढिगारे आणि मोठमोठ्या दगडी मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावर येऊन कोसळल्या असल्या तरी यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी एक वेळा या ठिकाणाहून परिसरात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब कोसळून जवळपास २४ तास या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.सध्या लागणाºया पावसामुळे केंबुर्ली गाव हद्दीतील यावळण भागातील डोंगराची माती खाली महामार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या जरी आलेल्या मातीच्या ढिगाºयामुळे कोणते नुकसान झाले नसले तरी अशाच प्रकारे पुढे अचानक माती खाली महामार्गावर आली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सद्यस्थितीत या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून रस्त्यालगत सुरक्षा म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आले असले तरी हे कुचकामी ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत याठिकाणाचे डोंगर फोडण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या मुंबई-गोवा महामार्गाची सुरक्षा धोक्यातच आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याची खबरदारी घेत तात्पुरत्या स्वरुपात का होईना काहीन काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.