शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीच्या गावातच दारूचा महापूर

By admin | Updated: April 28, 2017 00:17 IST

महिलांच्या पुढाकाराने येथे दारूबंदी तर झाली. परंतु पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावातील काही अवैध

निराशा : टाकरखेड्यात मद्यपींचा हैदोस टाकरखेडा संभू : महिलांच्या पुढाकाराने येथे दारूबंदी तर झाली. परंतु पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावातील काही अवैध दारूविक्रेत्यांच्या मनमानीमुळे गावात दारूचा महापूर आल्याचे चित्र दिसून येत आहे. मद्यपींच्या हैदोसाला महिला कंटाळल्या आहेत. टाकरखेडा संभू या गावात दारूमुळे हत्येसह अनेक अपराधिक घटना घडल्या आहेत. यामुळे महिला कंटाळल्या होत्या. त्यामुळे महिलांनी संघटित होऊन १२ वर्षांपूर्वी दारूबंदीचा नारा लावला आणि गावातून दारूचे दुकान हद्दपार केले आणि त्याच दिवशी महिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, काही समाजकंटकांनी चक्क पोलिसांना हताशी धरून गावात अवैध दारू विक्री सुरु केली. एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे दारूचा महापूर आशी स्थिती गावात निर्माण झाली आहे. ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आठवडी बाजार आणि ग्रामपंचायतनाजीकचा परिसर आदी ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यावर पोलिसांच्या वचक नाही. त्यांमुळेच खुलेआम दारू विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे आता गावात भांडण तंटे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. परिणामी पुन्हा महिलांचा त्रास वाढला आहे. माहिलांनी गावातील दारूचे दुकान बंद तर केले, परतु गावात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावातील दारूचे दुकान महत्प्रयासाने बंद केले असले तरी अवैध दारू विके्रत्यांचे भूत महिलांच्या मानगुटीवर आजही कायम आहे. (वार्ताहर)