शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महाड तालुक्यात पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:42 IST

उपचारासाठी ग्रामस्थांची होते धावाधाव; मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

दासगाव : ऐतिहासिक पाचाड गावात रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णावर उपचार करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना धावाधाव करावी लागत आहे. याठिकाणी रात्रीच्या सेवा बजावण्यास एक डॉक्टर नेमलेले असतानादेखील डॉक्टर उपस्थित राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीकडे जिल्हा प्रशासनदेखील दुर्लक्ष करत आहे.किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी पाचाड, सांदोशी, सावरट, रायगडवाडी, नेवाळी, हिरकणीवाडी, आमडोशी, करमर, बावळे, बाउलवाडी, पुनाडे, घरोशी, छत्रीनिजामपूर, टकमकवाडी या गावांना या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आधार आहे. याशिवाय किल्ले रायगडावर आलेल्या पर्यटकांनादेखील याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांवर निर्भर राहावे लागत आहे. या गावांना पाचाड वगळता जवळपास २४ किमी अंतरावर महाडमध्ये उपचारासाठी किंवा प्रसूतीसाठी येणे शक्य होत नसल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारासाठी नेहमीच गर्दी असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इमारतीची आणि इतर आरोग्य सुविधांचे तीन तेरा वाजले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी कायम आवाज उठवला मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री प्रसूती किंवा अन्य आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील रुग्ण दाखल होतात. मात्र रात्रीच्या सुमारास डॉक्टर उपलब्ध नसतात यामुळे या रुग्णांना येथील परिचारिकांच्या उपचारावर अवलंबून राहावे लागत आहे. डॉक्टर याठिकाणी राहत नसल्याने याठिकाणी उपचार होत नाहीत, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.डॉक्टरच रात्री उपलब्ध नसल्याने ऐन रात्री आलेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी २४ किमीवर महाडला नेणे अवघड होत. मात्र यादरम्यान अनेकवेळा रुग्णाचा जीव धोक्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. दुर्गम डोंगराळ भाग असल्याने याठिकाणी अनेकवेळा सर्प आणि विंचू दंश होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीखाली असणे गरजेचे असते, मात्र याठिकाणी डॉक्टरच नसल्याने रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असल्याचे स्थानिक नागरिक अजय गायकवाड यांनी सांगितले.निवासस्थानांच्या इमारतीची दुर्दशाकर्मचारी आणि डॉक्टर यांना राहण्यास असलेल्या कर्मचारी वसाहतीची पुरती वाट लागली आहे. इमारतीचे छप्पर नुकत्याच आलेल्या वादळात उडून गेले आहेत. यामुळे या इमारतीमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर राहण्यास तयार नाहीत. त्यातच पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही महिला डॉक्टर असल्याने मोजक्या कर्मचारी वसाहतीमध्ये राहणेदेखील धोकादायक आहे.स्थानिक नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष तरी कोणी द्यायचे?पाचाड ग्रामस्थांनी स्थानिक रुग्ण कल्याण समिती, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आदींकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र गेली अनेक वर्ष याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक आमदार भरत गोगावलेदेखील या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून अनेकवेळा किल्ले रायगड आणि परिसरात गेले आहेत त्यांनीदेखील कधीच या रुग्णालयाची स्थिती जाणून घेतलेली नाही.गेली अनेक वर्षे आम्ही स्थानिक ग्रामस्थ पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ऐन रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत आहे मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, यामुळे परिसरातील रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.    -शाश्वत धेंडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचाड