शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:06 AM

रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबागजवळील नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलात होणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबागजवळील नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलात होणार आहे. मतमोजणीकरिता निवडणूक यंत्रणा जय्यत तयारीत असून, मतमोजणीच्या एकूण १५६ फेºया होतील. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय होणाºया प्रत्येक मतमोजणी फेरीसाठी प्रत्येकी १४ टेबल असतील व १५६ फेºया होणार आहेत. त्यात सर्वाधिक २८ मतमोजणाच्या फेºया महाड विधानसभा मतदारसंघात आणि सर्वात कमी २३ मतमोजणीच्या फेºया गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांपैकी १० लाख २० हजार १४० मतदारांनी मतदान केले आहे. एकूण ६१.७६ टक्के मतदान झाले आहे.सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत.त्यानंतर पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणारआहेत.रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण १००५ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण ९३९९असे एकूण १०८०४ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत अनुक्र मे ७५५ व ४८५५ अशी एकूण ५५६० मते प्राप्त झालेली आहेत सर्वप्रथम या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाणार आहे.२२ मे रोजी रंगीत तालीमसर्व मतदारसंघाची टेबल व फेरीनिहाय मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना ३० एप्रिल रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आलेले असून शनिवार १८ मे रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतमोजणीची रंगीत तालीम २२ मे रोजी नेहुली येथे घेण्यात येणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.मतदारसंघनिहाय आकडेवारीमतदार मतदान मोजणी झालेलेसंघ केंद्र फेºया मतदानपेण 375 27 195567अलिबाग 377 27 189713श्रीवर्धन 351 25 152664महाड 392 28 168580दापोली 363 26 171907गुहागर 321 23 141709एकूण 2179 156 1020140

टॅग्स :raigad-pcरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक