शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’; खड्ड्यांमुळे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 06:33 IST

रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; प्रवासी त्रस्त

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेर ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या महामार्गाच्या नूतनीकरणचे काम चालू असल्याने ठरावीक अंतरावर नवीन काँक्रीटीकरण झाले आहे; मात्र या रस्त्याला जुना रस्ता एकत्र करताना अनेक ठिकाणी रस्ता वळवण्यात आला आहे. यामुळे नुसतीच खडीची मलमपट्टी केल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सर्व महामार्गाची दैना उडालेली दिसत आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून या वळणांमुळे मोठी अडचण वाहतुकीदरम्यान येत आहे. याच बरोबर या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंद गतीने सुरू असून वाहतूककोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात ऊसरघर, कुरवडा फाटा, गारळ, तळेगाव, तिलोरे, कोशिंबळे अशा अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे रस्ता वळवण्यात आला आहे. या ठिकाणी नुसती खडी व ग्रिडचा वापर करून मलमपट्टी केली आहे, ती पावसात टिकत नसून तिथे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना या ठिकाणी गाडी चालविणे अवघड झाले आहे. या ठिकाणी वारंवार खडी असल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत.

तसेच हा महामार्ग तयार करीत असताना काही ठिकाणी भराव केल्याने जुना रस्ता पाण्याखाली येत आहे. या ठिकाणी पाऊस आला की पाणी साचत आहे, निचरा होत नाही.अशा ठिकाणी कोणतीही चारचाकी गाडी गेली असता जवळच दुचाकीस्वार आला तर त्या पाण्याने त्या दुचाकीस्वाराची आंघोळ होते. या रस्त्यावरून जाताना चालकांना खूपच कसरत करावी लागत आहे.

माणगावपासून इंदापूरकडे जाताना दोन किलोमीटर अंतरावर पेण खरवली फाट्यावर महामार्गाचे काम चालू असल्याने साइडपट्टी नसल्याने त्या ठिकाणी मागील दोन महिन्यात अनेक अपघात झाले असून अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे. या ठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज असून तशी मागणी होत आहे.

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा१) पेण : मुंबई-गोवा महामार्गावर गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडतो आहे. अवजड वाहतुकीमुळे महामार्गावर वडखळ नाका ते पेण भोगावती पुलापर्यंत ७ किमी पट्टा खड्डेमय झाला आहे. ठेकेदार कंपनीने अंतोरा फाटा ते रामवाडी पुलापर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सतत करावे लागत असल्याने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र खड्डे जागोजागी असल्याने ही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे.

२) रामवाडी विभागीय बस स्थानकात रात्री येणाऱ्या कोकणातील एसटी बसेना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे. यावर्षी जास्तीत जास्त कोकणातील चाकरमानी रेल्वेनेच परतीचा प्रवासाला पसंती देऊन मुंबईकडे जाताना दिसतात.

३)महामार्गावर दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० पर्यंत थोडीफार वाहतूककोंडी निर्माण होते. एकंदर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी व खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा बनला आहे.वाहतूककोंडीची समस्यापोलादपूर : महामार्गवर शेकडो एसटी बसेससह हजारो लहान चारचाकी गाड्या आल्याने पोलादपूर बसस्थानाक परिसर महाड, माणगांव, इंदापूर, वडखळ आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच अनेक ठिकाणी खड्डेमय मार्ग असल्याने वाहनाचा वेग मंदावत आहे. या कोंडीचा प्रवाशांना त्रास होत असून पावसामुळे प्रवासातील अडचणी वाढल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Potholeखड्डेhighwayमहामार्ग