पनवेल महानगरपालिकेत महाविकास आघाडीतील शेकाप,काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे १८ नगरसेवक निवडून आले आहेत. तिन्ही पक्षांचे कोंकण भवन येथील एकत्रित गट नोंदणी बाबत एकमत होताना दिसून येत नसल्याने तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपल्या गटांची नोंदणी करणार असल्याचे बोलले जात आहे.शिवसेना ठाकरे गटाने दि.२ रोजी आपल्या नगरसेवकांची नोंदणी करीत लीना गरड यांची गटनेते पदी नियुक्ती केली.
संख्याबळानुसार शेकापचे ७,शिवसेना उबठाचे ७ आणि काँग्रेसचे ४ संख्याबळ आहे. विरोधीपक्षात बसणाऱ्या विरोधकांमध्ये शिवसेना आणि शेकापने आपल्या संख्याबळानुसार विरोधीपक्ष नेते पदावर दावा केल्याने शेकाप आणि शिवसेनेत खटके उडत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी शून्य संख्याबळ असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने शेकापची ७ जागांची शेकापची बरोबरी केल्याने शिवसेनेने स्वतंत्रपणे एक स्वीकृत आणि अडीच वर्ष विरोधीपक्ष नेते पदावर दावा केल्याने शेकाप नेते संतापले आहेत. पनवेल मध्ये शेकाप नेते बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात निवडुणका लढवल्या गेल्याने बाळाराम पाटील यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीची पुढील वाटचाल होणे गरजेचे असताना शिवसेनेच्या वाढलेल्या ताकदीमुळे शिवसेना मोठा भाऊ होण्याच्या तयारीत दिसत असल्याने कोंकण भवन येथील नगरसेवकांच्या गटाची नोंदणी लांबली होती.
पालिकेत आपले स्वतंत्र अस्तित्व रहावे या उद्देशाने शिवसेना ठाकरे गटाने आपली स्वतंत्र गटाची नोंदणी केली.तर कॉग्रेसची साथ शेकापला लाभत असल्याचे दिसून येत आहे.पालिकेत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.निवडणुकीपूर्वीच नियोजन ते निवडून झाल्यानंतरच्या नियोजनात भाजप महाविकास आघाडीच्या दोन हात पुढे राहिले आहे.महायुतीच्या ५९ नगरसेवकांना एकत्रित करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या गटाची कोंकण भवन येथे नोंदणी करून ४ दिवस उलटले आहेत. मात्र, १८ नगरसेवकांच्या नोंदणीसाठी अद्याप महाविकास आघाडीची चर्चाच सुरु आहे.त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वयाचा आभाव दिसून येत आहे.
"शेकाप, काँग्रेस एकत्रित गट स्थापन करून पालिकेत विरोधीपक्ष नेते आणि स्वीकृत नगरसेवक पदावर समसमान दावा करणार आहे.शिवसेना ठाकरे गट सोबत आल्यास त्यांचे स्वागत असेल अन्यथा आम्ही आमची भूमिका घेण्यास स्वतंत्र आहोत."- सुदाम पाटील (नेते महाविकास आघाडी, पनवेल )
"आमची भूमिका महाविकास आघाडीसोबतच गट स्थापन करण्याची आहे.पक्षाचे धोरण आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही राज्यभर शिवसेनेच्या नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी करीत आहोत.त्यानंतर आम्ही एकत्रच पालिकेत भाजपविरोधात लढणार आहोत.आम्ही एकत्रच आहोत.आमच्यात कोणताही समन्वयाचा आभाव नाही."- बाळ माने (नेते, शिवसेना ठाकरे गट )
Web Summary : Panvel's Maha Vikas Aghadi faces strain as Shiv Sena (Thackeray) registers independently. Disagreement over leadership roles and power dynamics between Shiv Sena, Shekap and Congress impacts unity. Future uncertain.
Web Summary : पनवेल में महा विकास अघाड़ी में तनाव, शिवसेना (ठाकरे) का अलग पंजीकरण। शिवसेना, शेकाप और कांग्रेस के बीच नेतृत्व भूमिकाओं और शक्ति गतिशीलता पर असहमति एकता को प्रभावित करती है। भविष्य अनिश्चित है।