पाणीपुरवठ्यासाठी विकासकाचा पुढाकार; महसूलच्या अधिकाऱ्यांनी केली सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:08 AM2019-03-30T00:08:07+5:302019-03-30T00:08:19+5:30

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील महिलांना पाण्यासाठी रात्र विहिरीवर काढावी लागते अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करून ग्रामस्थांची समस्या मांडली होती.

Developer's initiative for providing water supply; Revenue officials note that | पाणीपुरवठ्यासाठी विकासकाचा पुढाकार; महसूलच्या अधिकाऱ्यांनी केली सूचना

पाणीपुरवठ्यासाठी विकासकाचा पुढाकार; महसूलच्या अधिकाऱ्यांनी केली सूचना

Next

- कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील महिलांना पाण्यासाठी रात्र विहिरीवर काढावी लागते अशा आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करून ग्रामस्थांची समस्या मांडली होती. या वृत्ताची दखल घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खासगी जमीन विकासकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यास सुरु वात झाली आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी जमीन विकासकांना पाणीपुरवठा करण्याबाबत केलेली सूचना मान्य केली असून शासनाचे टँकर सुरू होईपर्यंत जमीन विकासक पाणीपुरवठा करणार आहेत.
खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे तेथील महिलांना रात्री विहिरीवर मुक्काम करावा लागत होता. तेथील विहिरींनी तळ गाठल्याने धाबेवाडी आणि बांगरवाडीमधील महिलांना घुटेवाडी येथे असलेल्या बंधाºयावर पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. तर त्या बंधाºयातील पाणी अशुद्ध असल्याने दूषित पाणी पिऊन ग्रामस्थ दिवस ढकलत होते. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्या भागात जमीन विकासक कर्जत प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे राजेंद्र माने यांना कर्जत तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी बोलावून घेतले. त्यांना धाबेवाडीमध्ये पाण्याची सोय करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार माने यांनी ५००० लिटर क्षमतेच्या दोन सिंटेक्स टाक्या धाबेवाडी येथे आणून त्या टाकीत दररोज टँकरचे पाणी ओतण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले. धाबेवाडी व बांगरवाडीमधील ग्रामस्थांची पाण्याची व्यवस्था केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त के ले आहे.
धाबेवाडीत बसविलेल्या दोन्ही पाण्याच्या टाकीत पाण्याचे टँकर ओतल्यानंतर खांडस ग्रामपंचायतीचे सरपंच मंगल ऐनकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाणीपुरवठा सुरू केला. या दोन्ही ठिकाणी शासनाचे टँकर सुरू होईपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन माने यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिले.

Web Title: Developer's initiative for providing water supply; Revenue officials note that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड