develop the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj | छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा, ग्रामस्थांची मागणी

- गिरीश गोरेगावकर
माणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि गादीचे वारस असलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक तालुक्यातील गांगवली या जन्मगावामध्ये उभारले जावे, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. माणगावपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगवली गावामध्ये महाराणी येसूबाईंच्या पोटी १८ मे, १६८२ या दिवशी थोरल्या शाहू महाराजांचा जन्म झाला, असा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे सर्वांचेच दुर्लक्ष झालेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास व्हावा आणि येथील इतिहास प्रकाश झोतात यावा, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

गांगवली गावच्या हद्दीत तोंडलेकरवाडी, कुंभारवाडी, बौद्धवाडी, मोकाशीवाडी, खरबाचीवाडी अशा पूर्वापार वाडत्ता आहेत. कुंभारवाडीतून साळवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुप्रसिद्ध वैजनाथ महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडून वाहणाºया वैपूर्णा नदीवर नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत बांधलेला फरसबंद नदीघाट आहे, तर पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात. मंदिराच्या समोरच चिरेबंदी वाड्याच्या खाणाखुणा आजही दिसतात.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाऱ्यांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो. परंतु अशा या ऐतिहासिक भूमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करावे, अशी मागणी गांगवली येथील ग्रामस्थांकडून होत आहे. पुरातत्त्व खात्याने याकडे लक्ष देऊन संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आाहे. अनेक नागरिकांना या प्राचीन वास्तूबाबत माहिती नसल्याने येथे माहिती फलक लावावे. या वास्तूचे संवर्धन झाल्यास येथे पयटक नक्कीच भेट देतील.

माणगावपासून राजधानी रायगडकडे जाणा-या मुख्य मार्गालगत असलेल्या या ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख असलेला साधा माहितीफलक दिसत नाही.
माणगाव तालुक्यात जन्म घेतलेल्या थोरल्या शाहू महाराजांच्या जन्मस्थळ परिसरात पूर्णाकृ ती मूर्ती स्मारक बनवावे, तसेच संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
पूर्व दिशेला रस्त्यालगत वीरगळ, सतीशिळा, शिवपींड, तसेच अनेक समाधी चौथरे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून येतात
छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म कालावधीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज, जोत्याजी केसरकर, रायप्पा, कवी कलश या सहकाºयांसोबत येथेच वास्तव्य केल्याचा उल्लेख जेधे करिना या विश्वसनीय बखरीमध्ये सापडतो.

माणगावच्या पावनभूमीत अनेक शूरवीरांचा जन्म
1शिवकालीन चिरेबंदी वाड्यावरच सन १९८० मध्ये रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अक्षरश: ओसाड अवस्थेत आहे.
2माणगावच्या पावनभूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर, पायदळप्रमुख येसाजी कंक, सरखेल कान्होजी आंग्रेंचे विश्वासू सरदार खंडोजी माणकर यांसारख्या शूरवीरांचा जन्म झाला आहे.
3याचबरोबर अठराव्या शतकातील आशिया खंडातील सर्वात ताकदवान अजातशत्रू सम्राट असं परकीय इतिहासकारांनी गौरविलेल्या छत्रपती शाहू महाराजांचे जन्मस्थान मात्र उपेक्षितच राहिले आहे. कुशल प्रशासक, धोरणी राजा आणि स्वराज्याचे चौथे छत्रपती अशी ओळख असलेल्या महापुरुषांच्या जन्मगावात विदारक चित्र पाहायला मिळते .

Web Title: develop the birthplace of Chhatrapati Shahu Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.