विषबाधा झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 04:47 IST2018-06-22T04:47:10+5:302018-06-22T04:47:10+5:30

महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा झालेल्या प्रकरणात गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला.

 The death of two more poisoned people | विषबाधा झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू

विषबाधा झालेल्या आणखी दोघांचा मृत्यू

खोपोली : महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा झालेल्या प्रकरणात गुरुवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. विजय शाहुराज शिंदे (११) या मुलाचा पनवेलमधील चिरायू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सुखम रुग्णालयातील अत्यवस्थ असलेले गोपीनाथ नकुरे यांचेही रात्री उशीरा निधन झाले.
महड येथे अन्नातून विषबाधा प्रकरणात शिंदे कुटुंबातील तिसरा बळी गेला आहे. सोमवारी रात्री मृत्यू झालेले ऋ षिकेश शाहुराज शिंदे (१२) व प्रगती श्याम शिंदे (१३) यांच्यावर बुधवारी सकाळी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर गुरु वारी याच कुटुंबातील तिसरा मुलगा दगावल्याने शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title:  The death of two more poisoned people

टॅग्स :Deathमृत्यू