शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पोलादपूरमध्ये ८६ लाख १६ हजारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:45 PM

चार हजार ९१ शेतकऱ्यांना फटका; बँक खाते क्रमांक जमा करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

- प्रकाश कदमपोलादपूर : पोलादपूर परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, चार हजार ९१ शेतकऱ्यांचे सुमारे १२६७.२० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या पोटी ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील दोन ते तीन वर्षांतील धान्य पीक नुकसानीची रक्कम प्रशासनाकडून थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी आपले बँक खाते व सहमती पत्र तलाठी सजा तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले आहे.आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांचे अतोनात नुकसान केले. हाती आलेले पीक वाया गेले असून भविष्यात सुक्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम राहिल्याने शेतकºयांना मदत कधी व केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारण्यात येत आहे.तालुक्यातील बाधित झालेल्या शेतीची पाहणी तहसील कार्यालयामधील महसूल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग, ग्रामसेवक यांच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यात पिकाखालील तीन हजार ७०३.६८ हेक्टर क्षेत्र असून, शेतकºयांची संख्या चार हजार ९१ इतकी आहे. या सर्व शेतकºयांचे पंचनामे पूर्ण झाले असून, बाधित झालेले क्षेत्र १२६७.२० हेक्टर असून सुमारे ८६ लाख १६ हजार ९६० रुपयांचे नुकसान झाले आहे.कापणी झाल्यावर पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांची संख्या ६४३ असून २६०.९० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तर उभ्या पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तीन हजार ४५७ शेतकºयांचे सुमारे १००६.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.113 शेतकºयांचे १०१.१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यात ३७७० सरासरी पाऊस पडत असतो. मात्र, यंदा सुमारे ५९०२ पावसाची नवीन विक्रमी नोंद झाली आहे. आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने शेतकºयांना मोठा फटका बसला असून शेतात पाणी साचल्याने पीक कुजले. तालुक्यात पीक विमा संरक्षित शेतकºयांची संख्या तुरळक आहे.धान्य पीक नुकसानभरपाई रक्कम प्रशासनाकडून तहसील कार्यालयद्वारा थेट शेतकºयाच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी शेतकºयांनी बँक खाते क्रमांक व सहमती पत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापोटी २०१७-१८ वर्षासाठी नुकसानभरपाईसाठी सुमारे ३२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.- दीप्ती देसाई, तहसीलदार, पोलादपूर