रानगव्यामुळे वालाच्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 23:54 IST2019-03-27T23:53:58+5:302019-03-27T23:54:07+5:30
वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

रानगव्यामुळे वालाच्या पिकांचे नुकसान
आगरदांडा : वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये वालाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र, रानगवे येऊन वालाच्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
वालाचे पीक तयार होण्यासाठी चार महिन्यांचा अवधी लागतो, या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करत असतो. मुरुड फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांना व स्थानिकांनी आनंद व्यक्त केला असला तरी सध्या रानगवे जंगलातून गावातील शेतात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रानगवा म्हशीसारखा काळा; परंतु यांच्या पायाखालील सफेद भाग तसेच यांच्या शेपटीला सफेद केस असतात. खूप वजनी व प्रचंड खाद्य खाणाऱ्या तसेच आकाराने खूप मोठ्या असल्याने सर्वसामान्य नागरिक घाबरून गेला आहे. जर शेतकऱ्यांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा जीव जाऊ शकतो.
वावडुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजित कासार व त्यांच्या शेजारच्या शेतात रानगव्यांनी वालाच्या शेताचे नुकसान करून जंगलात पसार झाले. तरी वन अधिकाºयांनी याची दखल घेऊन योग्य तो मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत
आहे.