सिलिंडर टंचाईने हिसकावला भाविकांच्या तोंडचा महाप्रसाद; पालीच्या श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:45 IST2026-03-21T12:44:39+5:302026-03-21T12:45:42+5:30

प्रसादाचा लाडूदेखील मिळत नसल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Cylinder shortage snatches away Mahaprasad from devotees' mouths Pali's Shri Ballaleshwar Devasthan's Annachhatra closed | सिलिंडर टंचाईने हिसकावला भाविकांच्या तोंडचा महाप्रसाद; पालीच्या श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद

सिलिंडर टंचाईने हिसकावला भाविकांच्या तोंडचा महाप्रसाद; पालीच्या श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद

विनोद भोईर -

पाली :  पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने अष्टविनायक गणपती मंदिर ‘श्री बल्लाळेश्वर देवस्थान’चे अन्नछत्र सद्य:स्थितीत बंद झाले आहे. प्रसादाचा लाडूदेखील मिळत नसल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या शेकडो भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

साधारणतः दिवसा आणि रात्री मिळून ४०० भाविक श्री बल्लाळेश्वर देवस्थानच्या अन्नछत्रात अत्यल्प दरात महाप्रसादाचा लाभ घेतात. एप्रिल आणि मेच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या दिवसाला ८०० च्या वर जाते. मात्र, गॅसअभावी अन्नछत्र बंद झाले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा नसल्याने आजूबाजूच्या हॉटेलमधील व्यवस्थाही कोलमडली आहे. जिथे व्यवस्था उपलब्ध आहे, तिथे भाविकांना अन्नछत्राच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त पैसे मोजावे लागत आहेत. केवळ भूक भागवणे हा उद्देश नसून देवस्थानचा सात्त्विक प्रसाद ग्रहण केल्याने मिळणाऱ्या मानसिक व आध्यात्मिक समाधानालाही भाविक मुकले आहेत.

शासकीय मदतीची अपेक्षा
अन्नछत्रासोबतच देवस्थानचा प्रसादाचा लाडू भाविकांमध्ये अत्यंत प्रिय आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा होत नसल्याने हे उत्पादनही थांबले आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने देवस्थानला व्यावसायिक गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

देवस्थानतर्फे अवघ्या ३० रुपयांमध्ये भाविकांना मुबलक भोजन दिले जाते. सेवाभावी वृत्तीने चालवला जातो. व्यावसायिक गॅसपुरवठा बंद असल्याने अन्नछत्र चालविता येत नाही. शासनाने व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध केल्यास सेवा सुरू 
करता येईल. 
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, श्री बल्लाळेश्वर देवस्थान

आम्ही दरवर्षी अष्टविनायक दर्शनासाठी येतो. बल्लाळेश्वराचा महाप्रसाद घेतल्याशिवाय आमची यात्रा पूर्ण होत नाही. मात्र, आता अन्नछत्र बंद असल्याने बाहेर महागड्या हॉटेल्सचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने लवकरात लवकर गॅसचा पुरवठा करून हे अन्नछत्र सुरू करावे.    
प्रदीप  खेरटकर, भाविक, ठाणे 
 

Web Title : गैस की कमी से बल्लालेश्वर मंदिर का अन्नछत्र बंद, भक्तों में निराशा

Web Summary : पश्चिम एशिया संघर्ष के कारण गैस सिलेंडर की कमी से बल्लालेश्वर मंदिर का मुफ्त भोजन सेवा बंद हो गया है। भक्तों को महंगा विकल्प अपनाना पड़ रहा है, वे किफायती और आध्यात्मिक रूप से महत्वपूर्ण 'महाप्रसाद' से वंचित हैं। मंदिर ने गैस आपूर्ति बहाल करने और सेवा और लड्डू उत्पादन फिर से शुरू करने के लिए सरकार से मदद मांगी है।

Web Title : Gas Shortage Closes Ballaleshwar Temple's Free Food Service, Disappointing Devotees

Web Summary : Due to gas cylinder shortages linked to West Asia conflicts, the Ballaleshwar temple's free food service is closed. Devotees face expensive alternatives, missing the affordable, spiritually significant 'Mahaprasad'. The temple seeks government help to restore gas supply and resume the service and laddu production.