शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने हरकती फेटाळल्या

By admin | Updated: November 16, 2016 05:40 IST

काँग्रेस आणि भाजपाने शेकापच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधात दाखल केलेली हरकत न्यायालयाने मंगळवारी फेटाळून

अलिबाग : काँग्रेस आणि भाजपाने शेकापच्या नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या उमेदवाराविरोधात दाखल केलेली हरकत न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. त्यामुळे शेकापच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण होते, तर काँग्रेस आणि भाजपाचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ असल्याचे दिसून आले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता अलिबाग नगर पालिकेच्या निवडणुकीत प्रचाराला चांगलाच वेग येणार आहे.शेकापचे प्रशांत नाईक हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर अनिल चोपडा हे प्रभाग ७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवार ठेकेदार असल्याबाबत काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी आक्षेप घेतला होता. यावर निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव बनसोडे यांनी शेकापच्या बाजूने निर्णय दिला होता. या विरोधात काँग्रेस आणि भाजपाने जिल्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सोमवारी निर्णय अपेक्षित होता मात्र, न्यायालयाने तो स्थगित ठेवला होता. दरम्यान, जिल्हा न्यायालयात अपेक्षित निकाल न लागल्याने, उच्च न्यायालयामध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपाचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. निकाल अपेक्षित होता, सत्याचा नेहमीच विजय होतो, असे शेकापचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)